WhatsApp New Features : व्हॉट्सअॅपच आल नव फीचर्स ! आता पर्सनल चॅटला करता येणार लॉक, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

WhatsApp Update : मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर जगभरातील लाखो वापरकर्ते चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी आता व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर जाहीर केले आहे.
WhatsApp New Features
WhatsApp New FeaturesSaam Tv

WhatsApp Chat Lock Option : मेटाने तयार केलेले इंस्‍टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वर सतत नवनवीन अपडेट येत राहतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर जगभरातील लाखो वापरकर्ते चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी आता व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर जाहीर केले आहे.

Meta च्या मालकीच्या WhatsApp या मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे वापरकर्त्यांना सतत नवीन फीचर्स दिले जातात आणि आता वापरकर्त्यांना सर्वात सुरक्षित अशी सुविधा देण्यात येणार आहे.

WhatsApp New Features
WhatsApp On Multiple Smartphone: मार्क झुकरबर्गची घोषणा! आता FB, Insta सारखं WhatsApp ही करता येणार लॉग आउट, जाणून घ्या कशी असेल प्रोसेस ?

झुकरबर्गने (Zuckerberg) सांगितल्यानुसार नुकतेच एकाच नंबरवरुन 4 डिव्हाइसवर लॉग इन करण्याचा एक सोपा पर्याय देण्यात आला आहे. येणाऱ्या नवीन अपडेटनुसार चॅट लॉकनुसार हे वैशिष्ट्य देण्यात येणार आहे. परंतु, हे फीचर्स (Features) सगळ्यांना मिळणार नाही. याची चाचणी बीटा आवृत्तीमध्ये केली जाईल.

ब्लॉग साइट WA Beta Info ने दिलेल्या माहीतीनुसार व्हाट्सअॅप अपडेट्स आणि फीचर्स हे बीटा टेस्टर्सना नवीन चॅट लॉक फीचर देण्यात येणार आहे. याचा फायदा असा की, वापरकर्त्यांना WhatsApp पूर्णपणे लॉक करण्याची गरज नाही आणि. यामध्ये चॅटला फक्त विंडो लॉक करू शकतात ज्यामुळे जे चॅट लपवायचे आहे ते लपवता येतील.

WhatsApp New Features
WhatsApp Chat Disappearing : नव फीचर्स ! Disappearing मोडवरुन डिलीट होणारे चॅट करता येणार सेव्ह...

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, नवीन फीचरमुळे लॉक केलेल्या चॅटचे फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड केल्यानंतर फोनच्या गॅलरीमध्ये दिसणार नाहीत.

1. अशा प्रकारे व्हॉट्सअॅपमध्ये चॅट लॉक केले जाऊ शकतात.

रिपोर्टमध्ये शेअर केलेल्या माहीतीनुसार वापरकर्त्यांना चॅट माहिती विभागात गेल्यानंतर नवीन चॅट लॉक वैशिष्ट्ये वापरण्याचा पर्याय मिळेल, जेथे वापरकर्त्याच्या प्रोफाइलशी संबंधित माहिती आणि कस्टम सूचना सेट करता येतील. कसे कराल हे जाणून घेऊया

WhatsApp New Features
Reel Star Trupti Rane : हम चले बहार में..., Bunny चा वेकेशन मोड ऑन !

1. नवीनतम बीटा आवृत्तीवर WhatsApp अपडेट करा.

2.यानंतर अॅप उघडा आणि चॅट विंडो उघडा जी तुम्हाला लॉक करायची आहे.

3.या विंडोच्या शीर्षस्थानी दिसणाऱ्या संपर्काच्या नावावर टॅप केल्यानंतर, खाली स्क्रोल करताना चॅट लॉकचा पर्याय दिसेल.

4. शेवटी तुम्ही 'लॉक या चॅट विथ फिंगरप्रिंट' पर्याय सक्षम करू शकता.

5. नवीन वैशिष्ट्याची निवडक वापरकर्त्यांसह चाचणी केली जात आहे आणि त्यात उपस्थित असलेल्या त्रुटीचे निराकरण केल्यानंतर, ते सर्वांसाठी स्थिर आवृत्तीचा एक भाग म्हणून जारी केले जाऊ शकते.

6. तुम्ही बीटा टेस्टर असाल तर तुम्ही त्याचा वापर सुरू करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com