
WhatsApp Service : WhatsApp हे सतत आपल्या वापरकर्त्यांसाठी त्याच्या अॅप्समध्ये नवनवीन फीचर्स जोडत असते. जगभरातील अनेक युजर्स याचा वापर करतात. नुकतेच, व्हॉट्सअॅपने AI-चालित चॅटबॉट हे नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. त्याच्या मदतीने कॅब बुकिंगपासून ते फ्लाइट स्टेटस आणि इतर सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो.
मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करून तुम्ही या सुविधांचा लाभ व्हॉट्सअॅपवर घेऊ शकता. या फीचर अंतर्गत लोकांना मासिक रेशन, फूड ऑर्डर, कॅब बुकिंग, फ्लाइट बुकिंग तसेच इतर सुविधा दिल्या जातील. यासाठी तुम्हालाही कोणतेही अॅप डाउनलोड न करता या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या सुविधांचा लाभ कसा घेऊ शकता याची हे जाणून घेऊया
याचा वापर कसा कराल ?
तुम्हाला व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 7977079770 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल.
यानंतर तुम्हाला हाय मेसेज लिहून पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला या सर्व सुविधांचा कॅटलॉग दिसेल.
यानंतर तुम्हाला ज्या काही सुविधा वापरायच्या आहेत किंवा वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्या तुम्हाला निवडाव्या लागतील.
तुमचे नाव, पत्ता इत्यादी माहिती द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. तुम्ही ऑनलाइन किंवा खरेदीनंतर पैसे देऊ शकता.
Whatsapp वर फ्लाइट स्टेटस कसे तपासाल ?
इंडिगो आणि एअर इंडियाचे स्टेटस तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारेही तपासू शकता. तुमच्या फोनमध्ये 9154195505 हा नंबर सेव्ह करून तुम्ही या दोन एअरलाइन्सच्या विमानांची स्थिती जाणून घेऊ शकता.
उबर कॅब बुक कशी कराल ?
व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुकिंगसाठी कोणालाही 7292000002 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. यानंतर, तुम्हाला हाय मेसेज पाठवावा लागेल. कंपनीकडून एक लिंक पाठवली जाईल, ज्यावर तुम्ही लॉगिन करून कॅब बुक करू शकता. यावर पिकअप आणि लोकेशनची माहिती द्यावी लागेल.
Whatsapp बँकिंग सिस्टम कशी असेल ?
सध्या बँकांकडून (Bank) व्हॉट्सअॅपवर अनेक सुविधा पुरविल्या जातात, ज्यामध्ये वैयक्तिक कर्ज घेण्यापासून बँकेत असणारी रक्कम, पेन्शन स्लिप आणि मिनी स्टेटमेंट इत्यादी माहितीचा समावेश आहे. PNB, SBI, HDFC आणि ICICI सारख्या बँका व्हॉट्सअॅपवर बँकिंग सुविधा पुरवत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.