Acidity Problems : अॅसिडिटीच्या दरम्यान डोकेदुखीचा त्रास का होतो? जाणून घ्या

जेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेमध्ये परत येते तेव्हा अॅसिडिटीच्या समस्या उद्भवतात.
Acidity Problems
Acidity ProblemsSaam Tv

Acidity Problems : सर्वांनाच अॅसिडिटीचा त्रास कधी ना कधी होत असतो यादरम्यान मळमळ होणे, छातीत जळजळ होणे ,डोकेदुखी होणे इत्यादी समस्या देखील होत असतात.

तसेच अस्वस्थ वाटणे, काहीही खाण्याचे इच्छा न होणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेमध्ये परत येते तेव्हा अॅसिडिटीच्या समस्या उद्भवतात.

Acidity Problems
Acidity Problem : छातीत वारंवार जळजळ होतेय ? 'या' 5 आयुर्वेदिक उपायांनी मिळेल त्वरीत आराम !

काही लोकांना अॅसिडिटी रिफ्लक्सच्या वेळी डोकेदुखीच्या समस्या खूप वाढतात. चला तर मग जाणून घेऊया अॅसिडिटी दरम्यान डोकेदुखीचा त्रास का होतो?

1. अॅसिडिटी झाल्यावर डोकेदुखीचा (Headache) त्रास का होतो?

  • डोकेदुखी आणि मायग्रेन संबंधित अॅसिडिटी आहे हे आतड्या आणि मेंदूच्या अक्षामुळे होते.

  • आतड्या आणि मेंदूमध्ये संबंध असते.अनेक तज्ज्ञांनी गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लेक्स आणि डोकेदुखी यांच्यातील दूवा ओळखले आहे.

  • आम्ल जेव्हा अनलिकेमध्ये परत जाते तेव्हा अॅसिड रिफ्लेक्स होते.

  • त्यानंतर जळजळ होण्याच्या समस्या येतात ही एक क्षणिक किंवा सतत चालू राहणारे स्थिती असू शकते.

  • एका अहवालानुसार ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास असतो त्यांना अॅसिडिटी रिफ्लेक्स चा धोका अधिक असतो.

  • त्याच प्रकारे ज्या लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असतो त्यांना अॅसिडिटी रिफ्लेक्सची चिंता (Stress), कमी डोकेदुखी असलेल्या लोकांपेक्षा जास्त असते.

  • तज्ज्ञांच्या मते डोकेदुखीच्या गोळ्या , अँटी-एन्फेमेट्री ड्रग्स किंवा पेन किलर इत्यादी औषधे प्रत्यक्षात अॅसिडिटी वाढवण्याची शक्यता असते.

  • डोकेदुखी मुळे आम्लपित्त होऊ शकते आणि मायग्रेनच्या समस्या वाढू शकतात.

Headache
Headache canva

2. अॅसिडिटी मॅनेज करण्यासाठी काही टिप्स

  • तुमच्या आहारात (Food) बदल करून तुम्ही अॅसिडिटी सारख्या समस्या सहज टाळू शकता.

  • जास्त मसालेदार, चरबीयुक्त पदार्थ आणि जड पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे टाळा.

  • तुम्हाला जर धूम्रपान आणि अल्कोहोल करण्याच्या सवय असेल तर त्याचे सेवन कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा.

  • रात्रीचे जेवण उशिरा न करता संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जेवण करणे गरजेचे आहे त्यामुळे जेवण आणि झोपेत दोन-तीन तासाचा फरक असेल. जेवण झाल्यावर लगेच झोपू नका त्यामुळे अॅसिडिटी सारख्या समस्या वाढतात.

  • कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

  • अतिरिक्त वजन कमी केल्याने अॅसिडिटी आणि डोकेदुखीशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com