World Red Cross Day : रेडक्रॉस डे का साजरा केला जातो ? जाणून घ्या महत्त्व व थीम

World red cross day History : जगभरात जागतिक रेडक्रॉस दिवस हा ८ मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस रेड क्रिसेंट दिवस म्हणूनही ओळखला जातो.
World Red Cross Day
World Red Cross DaySaam tv

Why Red Cross Day Celebrate : जगभरात जागतिक रेडक्रॉस दिवस हा ८ मे रोजी दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस रेड क्रिसेंट दिवस म्हणूनही ओळखला जातो. रेड क्रेसेंट चळवळ हे जगातिक नेटवर्क असून हे जगभरातील प्रत्येक देशात कार्यरत आहे.

इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस (ICRC) ही संस्था आपत्कालीन, आपत्ती, संघर्ष व संकटाच्या वेळी इतर गरजू लोकांना मदत करते. ही चळवळ मानवी दुःख दूर करण्यासाठी, मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आणि शांतता, आरोग्य (Health) आणि जागतिक कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते.

World Red Cross Day
World Ovarian Cancer Day 2023 : महिलांना गर्भाशयच्या कर्करोगाचा अधिक धोका ! कसे ओळखाल ? जाणून घ्या लक्षणे

इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (ICRC) चे संस्थापक आणि पहिले नोबेल शांततेचे पुरस्कार प्राप्तकर्ते हेन्री ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस पाळला जातो.

  • जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्याचा उद्देश इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (ICRC) चे संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता पारितोषिक प्राप्तकर्ते हेन्री ड्युनंट यांच्या प्रयत्नांची आहे.

  • जागतिक रेडक्रॉस दिनाचा इतिहास रेडक्रॉस चळवळीशी जोडलेला आहे.

  • 1859 मध्ये हेन्री ड्युनंटने दुसऱ्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धात इटलीच्या सॉल्फेरिनोच्या युद्धभूमीवर जखमी सैनिकांच्या वेदना पाहिल्या.

  • जखमी सैनिकांना योग्य उपचार न मिळाल्याने आणि वैद्यकीय सेवा आणि मदतीचा अभाव पाहून हेन्री घाबरला होता. त्यादरम्यान, त्यांनी जखमींना त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पर्वा न करता मदत केली. त्यासाठी त्यांनी स्थानिक नागरिकांनाही संघटित केले.

World Red Cross Day
How To Give Cow Milk to Babies : कोणत्या महिन्यापासून बाळाला गायीचं दुध पाजायला हवे ?
  • रणांगणावरील या अनुभवावर हेन्रीने ए मेमरी ऑफ सॉल्फेरिनो नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात युद्धादरम्यान जखमींची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवी गट स्थापन करण्याविषयी लिहिले होते.

  • 1863 मध्ये, त्याच्या प्रयत्नांमुळे जखमींच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय समितीची स्थापना झाली, ज्याला नंतर आंतरराष्ट्रीय समिती ऑफ रेड क्रॉस (ICRC) म्हणून ओळखले जाते.

2. हा दिवस कधीपासून साजरा (Celebrate) केला जातो ?

  • ICRC चा उद्देश युद्ध किंवा सशस्त्र संघर्षांदरम्यान जखमी आणि गरजूंना मदत करणे आहे.

  • जागतिक रेड क्रॉस दिवसाची कल्पना 1920 च्या दशकात मांडण्यात आली होती. 1933 मध्ये टोकियो, जपानमधील रेड क्रॉसच्या 20 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेस दरम्यान अधिकृतपणे स्थापित केले गेले.

  • या कार्यक्रमात हेन्री ड्युनंट यांच्या जन्मदिनी दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हापासून दरवर्षी ८ मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com