Workout Tips : महिलांनी 'या' काळात करु नये वर्कआउट, अन्यथा...

आपण कोणत्या परिस्थितीत वर्कआउट टाळायला हवे हे जाणून घ्या.
Workout Tips
Workout TipsSaam TV

Workout Tips : रोज सकाळी नियमित वर्कआउट केल्याने आपले शरीर ताजेतवाने राहाते. आपल्या शरीराला व्यायाम करणे किती गरजेचे आहे हे आपल्या प्रत्येकाला माहित आहे.

वर्कआउट केल्याने आरोग्य निरोगी राहाते आणि हे नेहमीच मानण्यात आले आहे. इतकंच नाही तर मानसिक तणावात असाल तर याचा नक्कीच फायदा होतो. मात्र व्यायाम करत असताना याच्या नियमांचं पालन करणेही आवश्यक आहे.

Workout Tips
Health Alert : वर्कआउट करताय? काळजी घ्या, अन्यथा होऊ शकतो शरीरावर विपरीत परिणाम

तंदुरुस्त राहण्यासोबतच एकाग्र राहण्यासाठी नियमित व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. परंतु काही परिस्थितींमध्ये महिलांनी अजिबात व्यायाम करू नये. ठराविक पोझिशनमध्ये काम केल्याने महिलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यासाठी आपण कोणत्या परिस्थितीत वर्कआउट टाळायला हवे हे जाणून घ्या.

१. गरोदरपणात

गरोदरपणात महिलांनी वर्कआउट करू नये. गर्भवती महिलांनी व्यायाम करणे टाळावे. पण तरीही, जर एखाद्या गर्भवती महिलेला वर्कआउट्स करायचे असतील, तर त्यासाठी सर्वप्रथम तिच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यावेळी विशेष काळजी घ्यावी लागेल तसेच व्यायाम हा सोप्या पध्दतीचा असायला हवा.

२. शस्त्रक्रिया

जर एखाद्या महिलेवर (Women) काही काळापूर्वी शस्त्रक्रिया झाली असेल तर तिने काही दिवस व्यायाम करू नये. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा व्यायाम सुरू करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. शस्त्रक्रियेनंतर लगेच वर्कआउट केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

Workout Tips
Fitness Tips : वर्कआउट करण्याची योग्य वेळ सकाळी की, संध्याकाळी ?

३. मासिक पाळीदरम्यान

मासिक पाळीदरम्यान वर्कआउट करू नये. मात्र, असा कोणताही नियम नाही. परंतु, या काळात रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा येतो, ज्यामध्ये महिलांना विश्रांती घेण्याची नितांत गरज असते. अशा वेळी वर्कआउट वगळणे हा एक चांगला पर्याय असेल.

४. अंगदुखी

त्याच वेळी, जर तुम्हाला तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर व्यायाम न करणे चांगले. आम्ही तुम्हाला सांगतो की शरीराच्या दुखण्यामध्ये वर्कआउट केल्यानंतर तुमच्या वेदना आणखी वाढू शकतात. तुमच्या शरीराचे दुखणे बरे झाल्यावरच तुम्ही व्यायाम करा.

Workout Tips
Fitness Freak : व्यायाम करायला वेळ नाही ? ऑफिसमध्ये करा याप्रकारे योग, शिल्पा शेट्टी सांगतेय त्याबद्दल

५. इजा

या सगळ्या व्यतिरिक्त आपल्याला काही गंभीर दुखापत झाली असेल तर अशा परिस्थितीतही तुम्ही वर्कआउट (Workout) किंवा व्यायाम करणे टाळावे. दुखापतीदरम्यान व्यायाम करणे तुमच्या शरीरासाठी अधिक घातक ठरू शकते. त्यामुळे या काळातही वर्कआउट्सकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com