Yoga Asanas For Healthy Life : 'या' योगासनाचे आरोग्याला आहेत अनेक फायदे, मधुमेह व मासिक पाळीसाठी रामबाण उपाय !

आपण नियमित ही आसने केल्यास होतील अनेक फायदे
Yoga Asanas For Healthy Life
Yoga Asanas For Healthy LifeSaam TV

Yoga Asanas For Healthy Life : सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीनुसार प्रत्येकाला आपल्याला आरोग्याची काळजी घेता येतेच असे नाही. त्यामुळे अनेकजण अनेक आजारांने ग्रस्त आहेत. त्यासाठी आपण नियमित योगासने किंवा व्यायाम करायला हवा.

योग केल्याने आपल्याला अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. तसेच नियमित केल्याने आपला दिवस देखील ऊर्जावान राहातो. त्यासाठी जाणून घेऊया कोणता योग केल्याने आपल्याला अधिक फायदा होतो.

१. अर्ध मत्स्येंद्रासन -

Ardha Matsyendrāsana
Ardha MatsyendrāsanaCanva

अर्ध मत्स्येंद्रासन योग मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. या योगामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीरातील ऊर्जा वाढते. यासोबतच हे आसन रोज केल्याने पाठ, मान, हात आणि छातीचे दुखणे दूर होते.

Yoga Asanas For Healthy Life
PCOS : तज्ज्ञांच्या मते, पीसीओएस असल्यासही तुम्ही राहू शकता गर्भवती; फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा !

२. पश्चिमोत्तनासन -

Paschimottanasana
PaschimottanasanaCanva

हे आसन झोपेच्या समस्यांवर मात करण्यास मदत करते. तसेच आळस आणि थकवा दूर करते. याशिवाय शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. याशिवाय सायनससारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे एक प्रभावी आसन आहे. चिंता, तणाव आणि नैराश्य यासारख्या मानसिक स्थितींपासून मुक्त होण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.

३. दंडासन -

Dandasana
DandasanaCanva

श्‍वसनाशी संबंधित आजारांवर (Disease) दंडासन अतिशय गुणकारी आहे. या योगामुळे फुफ्फुसे मजबूत होतात. दंडासन स्नायू आणि मज्जातंतूंच्या वेदना कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. चिंता आणि तणाव इत्यादी कमी करण्यास आणि मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करते.

Yoga Asanas For Healthy Life
Pranayam Benefits : बाळाचा विचार करताय? अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय? 'या' प्राणायमाचे होतील फायदे !

४. विपरीत करनी आसन -

Viparita Karani
Viparita KaraniCanva

पाय दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी यांसारख्या शरीरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेदना दूर करण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान पेटके कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

५. नावासन -

Navasana
NavasanaCanva

वजन कमी करणे आणि चरबी कमी होणे या दोन्हीमध्ये याचा सराव करणे खूप फायदेशीर आहे. हे आसन कॅलरी आणि चरबी लवकर बर्न करण्यास मदत करते. ओटीपोटाच्या स्नायूंना टोन करण्यास मदत करते आणि मणक्याच्या हाडांमधली वेदना कमी करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com