महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

भूषण अहिरे
मंगळवार, 1 जून 2021

मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी Officer तसेच कर्मचारी Staff संयुक्त संघटनेतर्फे आज पासून म्हणजेच 1 जून पासून काळ्या फिती Black ribbons लावून काम सुरू ठेवले आहे.

धुळे -  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील Maharashtra Life Authority कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग Seventh Pay Commission लागू केलेला नाही . त्यामुळे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी Officer तसेच कर्मचारी Staff संयुक्त संघटनेतर्फे आज पासून म्हणजेच 1 जून पासून काळ्या फिती Black ribbons लावून काम सुरू ठेवले आहे. (Maharashtra Jeevan Pradhikaran employees' agitation with ribbons)

केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू करून साडेपाच वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला आहे.  राज्य शासनाने जानेवारी 2019 पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्था, विविध शैक्षणिक संस्था, आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे .

हे देखील पहा - 

 

परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही . तसेच सहाव्या वेतन आयोगातील 24 वर्षांची कालबद्ध पदोन्नती व सुधारित वाहतूक भत्ताही मंजूर करण्यात आलेला नाही . 

गूगल फोटोजची आजपासून फ्री सेवा बंद 

त्यामुळे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी आजपासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतरही राज्य शासनाने सातवा वेतन आयोगा संदर्भात सकारात्मक पावले उचलली नाही तर यापुढे टप्याटप्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी  दिली आहे . 

Edited by - Puja Bonkile 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live