Koregaon Bhima: कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरात तिस-या डोळ्याची नजर; २४० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांसह ४५०० पोलीस बंदोबस्तात तैनात

हिंसाचार होऊनये यासाठी कोरेगाव भीमा परिसरात २४० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.
Koregaon Bhima
Koregaon BhimaSaam TV

Koregaon Bhima: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभावर शौर्यदिन सोहळा साजरा केला जातो. यंदा या सोहळ्यात १४ ते १५ लाख अनुयायी येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरेगाव भीमा परिसरात २४० सीसीटिव्ही कँमेरे आणि ड्रोन कँमेरातून बारीक नजर ठेवली जाणार आहे. तसेच ४५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. (Latest Bhima Koregaon)

विजयस्तंभावर शौर्यदिन सोहळा साजरा होत असताना करणी सेनेने विरोध केल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शौर्यदिन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात ठिकठिकाणी २४० सीसीटिव्ही कँमेरे लावण्यात आलेत. तसेच स्वतंत्र कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोरेगाव भिमाला शौर्यदिन सोहळ्यावर तीस-या डोळ्याची नजर असणार आहे.

Koregaon Bhima
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : 'भीमा' त धनंजय महाडिकांचा विजय, पॅनेलची सरशी

प्राप्त माहितीनुसार, एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त अंजुम इनामदार यांना बंदी केली आहे. अंजुम इनामदार १ जानेवारीला भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणार होते. अशात आता बंदी घातल्याने केंद्र सरकारच्या विरोधात विजयस्तंभ येथे आंदोलन करण्याचा इशारा अंजुम इनामदार यांच्या मुस्लिम मुल निवासी संघटने कडून देण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी पोलिसांकडून त्यांना भीमा कोरेगाव येथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Koregaon Bhima
Koregaon Bhima Breaking : कोरेगाव भीमा परिसरात मोठा बंदोबस्त; पाहा नेमकं काय आहे प्रकरण | SAAM TV

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. अज्ञातांनी आणि काही समाज कंठकांनी येथे आलेल्या लाखो बौद्ध अनुयायांना मारहाण केली. मोठ्या जमावाकडून अनुयायांवर दगडफेक करण्यात आली. तसेच काहींनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तसेच परिसरातील गावांमधील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. यामुळे आता देखील अशा प्रकारचा हिंसाचार होऊनये यासाठी कोरेगाव भीमा परिसरात २४० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com