Gondiya Accident News : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू, ह्रदयद्रावक घटना!

Gondiya Accident News : गोंदिया जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
Gondiya Accident News
Gondiya Accident NewsSaam TV

Gondiya Accident News : गोंदिया जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ चिमुकलीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.  (Latest Marathi News)

Gondiya Accident News
Shraddha Walkar Case : श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावालाला जेलमध्ये मारहाण; कैदी एकत्र जमले अन्...

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना (Police)  दिली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. ही दुर्देवी घटना ठाकणी ते भागवत टोला रस्त्यावर घडली.

आदित्य बिसेन (वय ७ वर्ष), मोहित बीसेन (वय ११ वर्ष), कुमेंद्र बिसेन (वय ३७ वर्ष) सर्व राहणार रा. दासगाव, आणि आर्वी कमलेश तूरकर (वय ५ वर्ष, नात्यातील मुलगी) रा. चुटिया, अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त (Accident News) बिसेन कुटुंबीय जिल्ह्यातील पिंकेपार येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते.

Gondiya Accident News
Girl Died Due To Heart Attack : घरातील हसरा चेहरा हरपला! 13 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लग्न आटोपून ते दुचाकीवरून घरी परतत असताना, ठाकणी ते भागवत टोला परिसरात (Gondiya News) समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन मुलांसह वडिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताना नंतर ट्रक चालत घटना स्थळावरून फरार झाला.

अपघाताची माहिती मिळताच, रामनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या चिमुकलीला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचाही मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com