agriculture news Farmer success story kantola kartule Nanded District
agriculture news Farmer success story kantola kartule Nanded DistrictSaam TV

Farmer Success Story: कर्टुल्याने केलं लखपती! 3 महिन्यातच शेतकरी झाला मालामाल; संघर्षगाथाही तेवढीच मोठी

Nanded Farmer Success Story: नांदेडच्या एका शेतकऱ्याने ३ एकर कर्टुल्याच्या शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

Nanded Farmer Success Story: पावसाळा सुरू झाला, की रानभाज्या मोठ्या प्रमाणात येत असतात. या रानभाज्यांना शहरात मोठी मागणी असते. कर्टुले ही एक रानभाजी असून ती माळरानावर उगवत असते. या भाजीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून जात असल्याने शेतकरी आता कर्टुल्याच्या शेतीकडे वळाले आहेत. नांदेडच्या एका शेतकऱ्याने ३ एकर कर्टुल्याच्या शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. (Latest Marathi News)

agriculture news Farmer success story kantola kartule Nanded District
Nashik Onion Market: नाशकातील कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशीही बंद; व्यापाऱ्यांचे परवाने होणार रद्द?

अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकरी हैराण झाला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा बसला होता. त्यामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यातच पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी सुद्धा राज्यात चांगला पाऊस झाला नाही. खरीप पिकांना पाणी नसल्याने महाराष्ट्रातील शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळलेत

कर्टुल्याच्या रानभाजीला तेलंगणा, हैदराबाद, विदर्भातून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी कर्टुल्याची शेती करीत आहेत. ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने कर्टुल्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे . नांदेडच्या भोकर तालुक्यातील हळदा येथील शेतकरी आनंद बोईनवाड या शेतकऱ्याने कर्टूल्याची शेती फुलवली आहे.

agriculture news Farmer success story kantola kartule Nanded District
Nashik Rain Crisis: वरुणराजा बरसेना.. नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; बळीराजा चिंतेत

या शेतीतून बोईनवाड हे लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. आनंद बोईनवाड यांनी मागील तीन वर्षापूर्वी आपल्या तीन एकर शेतात कर्टुल्याची लागवड केली. भोकर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी गंगाधर हणमांगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईनवाड यांनी कर्टुल्याची लागवड केली. तीन वर्षाच्या जीवापाड मेहनतीनंतर बोईनवाड यांच्या शेतात कर्टुल्याची पिक बहारून आलं.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही भाजी तोडणीला येते. आरोग्यदायक, अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्याने बाजारात या रानभाजीला मोठी मागणी आहे. बाजारात तीनशे रुपये किलो दराने ही भाजी विकली जात आहे. बोईनवाड यांनी तीन एकरात कुर्टुल्याची लागवड केली असून लागवडीचा खर्च जाऊन बोईनवाड यांनी तब्बल ८ लाख रुपयांचा निवळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com