Balasaheb Thorat: सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस, शेतकऱ्यांना मदत नाही; बाळासाहेब थोरात यांचा आरोप

सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस, शेतकऱ्यांना मदत नाही; बाळासाहेब थोरात यांचा आरोप
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv

संगमनेर (अहमदनगर) : शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतच्‍या बातम्‍या पहिल्या तर प्रचंड मोठी मदत मिळाली अस वाटते. परंतु, प्रत्यक्षात अजून अनेक भागात पंचनामे नाही. काही लोक दौरे करून फक्त फोटो टाकताय. मात्र वस्तुस्थितीत कोणतीही मदत (Farmer) शेतकऱ्यांना मिळाली नसून सरकारकडून सध्या फक्त घोषणांचा पाऊस सुरू असल्‍याची टीका (Balasaheb Thorat) माजी मंत्री बाळासाहे थोरात यांनी केली. (Tajya Batmya)

Balasaheb Thorat
NCP News: ऐन दिवाळीच्या दिवशी खाल्‍ली चटणी भाकरी; राष्‍ट्रवादीचे आनंदाचा शिधासाठी आंदोलन

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत (Sangamner) संगमनेर तालुक्यातील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) कार्यस्थळावर दिपावलीनिमित्त लक्ष्मीपूजन करण्यात आले. राज्यातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा देताना थोरात यांनी विविध विषयांवर भाष्य केले

पीकविमा कंपनीकडून कायमच नफाखोरी

दोन वर्षांनंतर यावर्षी दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. मात्र यावेळी शेतकरी कठीण परिस्थितीला सामोरा जात असून शासनाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे हीच अपेक्षा आहे. पीकविमा कंपनी कायमच नफाखोरी करण्याचा प्रयत्न करते. अनेक वर्षांपासून नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. आम्ही यासाठी पॅटर्न केला होता. मात्र त्याला केंद्राने मान्यता दिली नाही असा दावा थोरात यांनी केला.

ठाकरेंवर टीका करणे चूकीचे

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका करणे चूक आहे. आजारी असताना सुद्धा त्यांनी आमच्या समवेत दौरे केलेत. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही अनेकदा एकत्र दौरे केले. त्यामुळे राजकरण म्हणून कोणीही टीका करू नये असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com