Ahmednagar News : संगमनेर-अकोले रस्त्यावर भीषण अपघात; ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू, हृदयद्रावक घटना

Sangamner Accident News : अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली
Ahmednagar Accident News
Ahmednagar Accident NewsSaam TV

सचिन बनसोडे, साम टीव्ही

Ahmednagar Accident News : अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तीन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar Accident News
Amravati News : कॉलेजला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली, परतलीच नाही; तरुणीसोबत घडली भयंकर घटना

ही दुर्देवी घटना संगमनेर-अकोले (Ahmednagar) रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ऋषीकेश हासे (वय २० वर्षे), सुयोग हासे (वय २० वर्षे आणि निलेश सिनारे (वय २६ वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त (Accident)  तरुण दुचाकीवरून अकोलेच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी संगमनेरवरून एक दुधाचा टँकर भरधाव वेगात येत होता.

Ahmednagar Accident News
Farmer March : भाऊ गेला तरी माघार नाही, आमच्या मागण्या मान्य करा; मृत कुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांची भूमिका

दरम्यान, मंगळापूर परिसरात या टँकरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com