
- अमर घटारे
Amravati News : चांदुर बाजार (chandur bazar) तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे आज (शुक्रवार) तीन दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे पाणी सोडण्यात आले असून परिणामी नदीला पुर आला आहे. (Maharashtra News)
ब्राह्मणवाडा थडी येथील मुख्य मार्गावरील पुलाचे बांधकाम गेल्या तीन महिन्यांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. आज चांदुर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे आज (शुक्रवार) तीन दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडल्याने माेठ्या प्रमाणात पाणी नदीत आले. ब्राह्मणवाडा थडी ते शिरसगाव कसबा (brahmanwada thadi to shirajgaon kasba road closed) या मार्गावरील दोन चाकी वाहतूक वगळता सर्व वाहतूक बंद पडली आहे.
दरम्यान हा मार्ग तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांना जाेडला जात असल्याने या मार्गावरील चार चाकी तसेच वाहतुकदारांची रस्ता तात्पूरता बंद झाल्याने माेठी अडचणी झाली आहे. वाहनधारकांनी पाणी कमी झाल्यानंतरच वाहने पुढे न्यावीत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.