Aditya Thackeray : बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

उद्या विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे.
Uddhav Balasaheb Thackeray
Uddhav Balasaheb ThackeraySaam TV

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

औरंगाबाद : उद्या विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. मात्र, या अनावरणापूर्वी ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाला जाणार का? असा प्रश्न माध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारला त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. (Maharashtra Political News)

Uddhav Balasaheb Thackeray
Maharashtra Politics : ठाकरे गटाचा भाजपला सर्वात मोठा धक्का; बडा नेता लावला गळाला!

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज औरंगाबादेत अंबादास दानवे यांच्यावतीने आयोजित केलेल्या हिंदूहृदयसम्राट चषकाचे उद्घाटन करायला आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर चांगलीच फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याठिकाणी आले असते तर आम्ही ही मॅच आधीच खेळली, आम्ही षटकार आधीच मारला असे म्हणाले असते अशा शब्दात त्यांनी शिंदेंना टोला लगावला. (Latest Marathi News)

शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्र अनावरणानंतर बुद्धी येऊ त्यांना त्यांची चूक कळू देत अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला तसेच काही लोकांच्या राक्षसी महत्वकांक्षामुळे राज्य मागे जात आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी उद्घाटन करताना क्रिकेटच्या पिचवर बॅटिंगही केली.

Uddhav Balasaheb Thackeray
Maharashtra Politics : राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी 2047ची वाट पहावी; भाजप नेत्याची खोचक टीका

आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. 'या गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण झालं असं माझं आजोबा म्हणतील,' असा टोला आदित्य ठाकरेंनी हाणला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या आजोबांच्या तैलचित्रांचं अनावरण होणार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे.

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाला जाणार?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackerau) यांना तैलचित्र अनावरण कार्यक्रमाचं नियंत्रण पाठवलं आहे. यावर माध्यमांनी उद्धव ठाकरे हे या अनावरण सोहळ्याला जाणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर उत्तर देताना हा राजकीय कार्यक्रम असल्यामुळे उद्धव ठाकरे जाणार नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com