Sugarcane Price: माळेगाव साखर कारखान्याकडून उसाला उच्चांकी दर

Baramati News : माळेगाव साखर कारखान्याकडून उसाला उच्चांकी दर
Sugarcane Price
Sugarcane PriceSaam tv

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या सत्काराच्या वेळी माळेगाव सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) राज्यात सर्वाधिक ऊस दर देईल; अशी घोषणा केली होती. (Baramati) त्यानंतर दोनच दिवसात माळेगाव कारखान्याने २०२२-२३ या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३ हजार ४११ रुपये इतका उच्चांकी दर जाहीर केला आहे. (Tajya Batmya)

Sugarcane Price
Lumpy Disease : पाच महिन्यात २३ जनावरांचा लम्पिने मृत्यू; कोट्यवधींच्या खर्चांनातरही निर्मूलन नाही

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार हे नागरी सत्कार आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी बारामतीत होणाऱ्या विकासकामांचा आढावा घेत अनेक मुद्दे मांडले होते. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना राज्यात सर्वाधिक दर देणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली होती.

Sugarcane Price
Parola News : सरकारच्या उदासीन धोरणा विरोधात पारोळ्यात राष्ट्रवादी रस्त्यावर; कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी दिले निवेदन

दोनच दिवसात निर्णय 
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नागरी सत्काराला दोन दिवस उलटल्यानंतर माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ऊस उत्पादक सभासदांना ३ हजार ४११ रुपये प्रतिटन दर देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून माळेगाव कारखान्याची ओळख आहे. त्यानुसार अजित पवार यांनी माळेगावच्या सभासदांना सर्वाधिक दर दिला जाईल अशी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर माळेगाव कारखान्याने प्रतिटन ३४११ रुपये हा राज्यातील सर्वाधिक दर जाहीर केल्याचं या कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com