Barsu Refinery Survey: बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटणार? विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक

Ratnagiri News: बारसु इथल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आंदोलन पुन्हा एकवटले
Barsu Refinery Survey
Barsu Refinery SurveySaam Tv

Vaibhav Kolvankar Arrested: कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी एका बाजूला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.

त्याच दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वैभव कोळवणकर यांच्यासोबत इतर दोन सहकाऱ्यांनाही देखील अटक करण्यात आली आहे.  तिघांनाही रत्नागिरीत ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi news)

Barsu Refinery Survey
Maharashtra Politics: भरमंडपात वरमाला, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर... सामनातून फडणवीसांना टोला

रत्नागिरीतील (Ratnagiri) बारसू रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणासाठी पोलीस दल सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसांनी पथसंचलन करत लॉंग मार्च काढला. सर्वेक्षण सुरळीत पार पडावं यासाठी बारसू परिसरात 2000 पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीसांना पाचारण करण्यात आले आहे.

रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेत तो बारसू, सोलगावमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता.

Barsu Refinery Survey
Crime News In Mumbai : आयुष्य उद्ध्वस्त झालं...; झटपट पैसे कमवण्यासाठी तरुणाने केलं हे भयानक कृत्य

आतापर्यंत या ग्रामस्थांनी तीन वेळा बारसू रिफायनरीचा सर्व्हे बंद पाडला आहे. 24 एप्रिलपासून बारसू रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण पुन्हा सुरू होण्याची माहिती मिळताच गेल्या काही दिवसांपासून बारसू आणि सोलगावासह आजूबाजूच्या स्थानिक ग्रामस्थांनी मोठे आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली होती. (Ratnagiri News)

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान काल काही नागरिकांना घरी पाठवण्यात आलं मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे, ती जागा मात्र आंदोकांनी सोडली नाही. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com