Barsu Refinery Survey : आजपासून बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला पुन्हा सुरुवात, 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात

Barsu Refinery Survey resumed from today: रिफायनरी विरोधक समितीचे सल्लागार सत्यजित चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Barsu Refinery Survey
Barsu Refinery Surveysaam tv

Barsu Refinery in Ratnagiri : रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला आजपासून होणार पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या विरोधकांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून 45 रिफायनरी विरोधकांना 144 सीआरपीसीअन्वये प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. काहींना बारसू पंचक्रोशीत तर काहींना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे.

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी पोलीस दल सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसांनी पथसंचलन करत लॉंग मार्च काढला. सर्वेक्षण सुरळीत पार पडावं यासाठी बारसू परिसरात 2000 पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीसांना पाचारण करण्यात आले आहे.

Barsu Refinery Survey
Mumbai Crime: पोलीस काहीच करू शकणार नाही म्हणत तरुणाला तलवार, हॉकी स्टिकने बेदम मारहाण

रिफायनरी विरोधकांच्या भोवती कायद्याचा फार्स

बारसू रिफायनरी (Barsu Refinery) विरोधकांनी सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने रिफायनरी विरोधकांभोवती कायद्याचा फार्स आवळला आहे. रिफायनरी विरोधक समितीचे सल्लागार सत्यजित चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कलम 151(3) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही 25 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (Latest Marathi news)

Barsu Refinery Survey
Weather Forecast Today: विदर्भावर पुन्हा गारपीटीचं संकट! येत्या २ ते ३ दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

गैरसमज दूर करू - पालकमंत्री

बारसू प्रकल्प हा माझ्या जिल्ह्यात होणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे सॅटेलाईटच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम झालेले आहे. या प्रकल्पास बाहेरचे लोक विरोध करत आहेत. आम्ही त्यांना व शेतकऱ्यांना समजावून सांगू, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. तसेच बारसु प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करू असेही त्यांनी अमरावती येथे बोलताना स्पष्ट केले. (Ratnagiri News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com