Beed Crime News : बीड की बिहार? सलग 3 दिवसात 3 हत्या; वाढत्या खुनाच्या घटनेने खळबळ

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

Beed News : बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 3 दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अद्याप यातील दोन प्रकरणात आरोपी अटक नाहीत.सलग तीन दिवसात तीन खून झाल्याने बीडचा पुन्हा बिहार होतोय की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

Crime News
NCP Contest Karnataka ELection : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; 'घड्याळ' चिन्हावर लढवणार कर्नाटक विधानसभा निवडणूक; ECचा मोठा निर्णय

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुरुवारी मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या रागातून, बीडच्या (Beed) पाली येथील बिंदुसरा धरणालगत, अक्षय नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मयत अक्षयची हत्या करणारे त्याचेच मित्र असल्याचे तपासात उघड झाले आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत कुक्कडगाव येथील गणेश आठवले यांच्या शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने या महिलेची गळा चिरुन हत्या केली असावी, त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीमध्ये फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Beed Crime News)

या महिलेचे वय साधारण 30 ते 32 वर्षांदरम्यान असावे. पिंपळनेर पोलिसांकडून (Police) महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंडके नसलेला मृतदेह आढळून आल्याने मृत महिला कोण आहे आणि मारेकरी कोण आहेत ? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Crime News
Mumbai-Pune Highway Bus Accident: मुंबई-पुणे महामार्गावरील बस अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू, प्रशासनाकडून मृतांची नावं जाहीर

या दोन घटनेच्या धक्यातून बीडकर सावरतात न सावरतात तोच तिसरी घटना आष्टी तालुक्यात समोर आली आहे. झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून पतीने खून केल्याची घटना, आष्टी शहरातील फुलेनगर येथे घडलीय. निलम संभाजी वाल्हेकर वय 32 असे मयत पत्नीचे नाव आहे. यातील आरोपी पती संभाजी वाल्हेकर याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान सलग तीन दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्याने, बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं बीडचा पुन्हा एकदा बिहार होतोय की काय ? असा प्रश्न समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com