Beed News : आजीच्या निधनानंतर वडिलांसोबत गेली; पण काळाने डाव साधला, ९ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

Beed Latest News : एका ऊसतोड कामगाराच्या मुलीचा ऊसाने भरलेल्या बैलगाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे.
Beed News
Beed NewsSaam TV

Beed News : बीड जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. एका ऊसतोड कामगाराच्या मुलीचा ऊसाने भरलेल्या बैलगाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात घडली आहे. (Latest Marathi News)

देवयानी भाऊसाहेब गायकवाड वय ९ वर्ष असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Beed News)

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरसिंग येथील भाऊसाहेब गायकवाड हे गेली दहा वर्षांपासून आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी ऊसतोडीचे काम करीत आहेत. ते कृष्णा सहकार साखर कारखान्यावर तीन महिन्यांपासून बैलगाडीवरून ऊसतोडणीचे काम करतात.

Beed News
Weather Updates Today : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; या भागात वादळी पावसाची शक्यता

भाऊसाहेब ऊसतोडणीसाठी बाहेरगावी असताना, त्यांची मुलगी देवयानी ही हिवरसिंगा येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. मात्र आजीचे निधन झाल्याने वडील देवयानीला सोबत घेऊन गेले होते.

मयत देवयानी ही आपल्या वडिलांसोबत बैलगाडीवर (Farmer) बसलेली होती. यादरम्यान अचानक तोल जाऊन ती खाली पडली आणि याचवेळी ती बैलगाडीच्या टायरखाली आल्याने तिचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com