
बीड : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी बीडच्या परळीत जाहीर कार्यक्रमातून माझे वडील दत्ताराव गुट्टे आहेत. असं म्हणत कमळासोबत असलेलं आपल्या वडिलांचं नातं सांगितलं. त्याचबरोबर (BJP) भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आताच्या भाजपमधील मंडळींनी कसं बाजूला केलं? मुंडे साहेबांचं काय केलं? हे सांगत सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या बीडच्या परळीत एका आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. (Maharashtra News)
सुषमा अंधारे (Shiv Sena) म्हणाल्या, की माझे वडील दत्ताराव गुट्टे आहेत. त्यांनी त्याकाळी परळीतील प्रत्येक घरावर कमळ कोरलं होतं. आजही माझ्या घरावर कमळ कोरलेलं आहे. मात्र त्यावेळची भाजपा वेगळी होती. त्यावेळची भाजपा ही अटल बिहारी वाजपेयींची, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजनांची, गोपीनाथ मुंडे साहेबांची भाजप होती. मात्र आताच्या भाजपने आपल्या असुरी सत्तेकांशीसाठी आडवाणींना बाजूला केलं. शेवटच्या काळात वाजपेयींना त्रास दिला. सुषमा स्वराज यांना टाईपलाईन केले आणि मुंडे साहेबांच्यासाठी काय केलं? हे मी वेगळं सांगायची गरज नाही.
त्यावेळी भाजप नेत्यांना पळून जावे लागलं
आपण सगळे जाणून आहात. किंबहुना मुंडे साहेबांची इथं जेव्हा चिता रचली गेली होती, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या भावना काय होत्या ? हे माहितेय. त्यावेळी भाजपच्या सगळ्या नेत्यांना एका हेलिकॉप्टरमध्ये कोंबून येथून पळून जावं लागलं होतं, इतक्या संतप्त भावना (Parali) परळीकरांच्या होत्या. हा इतिहास आपण बघितलेला आहे. आज त्याच परळीत मी बोलत आहे. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.
भाजपचे छळवादी राजकारण
आता पुन्हा एकदा भाजपचे त्याचप्रमाणे छळवादी राजकारण सुरू झाले आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा तो विचार दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही हा विचार साक्षात आणायचा असेल तर या छळवादी राजकारणाला तोंड देण्यासाठी आता ठामपणे उभे राहावं लागेल. असं म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह भाजपमधील नेत्यांवर टीकास्त्र सोडत निशाणा साधला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.