Holi Festival 2023: अशी धुळवड कधी ऐकली नसेल..गावातून निघून गेले २०० जावई; अख्खी सासुरवाडी शोधायला निघाली

अशी धुळवड कधी ऐकली नसेल..गावातून निघून गेले २०० जावई; अख्खी सासुरवाडी शोधायला निघाली
Holi Festival Beed News
Holi Festival Beed NewsSaam tv

Holi Festival UJnique Story : आतापर्यंत आपण जावयाची हाऊसमौस.. मान सन्मान पाहिला असेल. मात्र असं एक गाव आहे, ज्या गावात धुळवडनिमित्त जो जावई सापडेल; त्या जावयाच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्याची गाढवावरून धिंड (Beed News) काढण्यात येते.

विशेष म्हणजे या गावाची अगदी निजाम काळापासून गेल्या ९० वर्षापासूनची ही परंपरा आहे. यामुळेच यंदा आपला नंबर लागू नये, या भीतीने गावातील जवळपास २०० जावईबापू गावातून पसार झाले आहेत.

मात्र परंपरा कायम ठेवायचीचं (Holi Festival) म्हणत हा ध्यास घेऊन ग्रामस्थांचे ४ पथक जावयाच्या शोधासाठी रवाना झालेत. नेमकं कोणतं आहे ते गाव ? आणि काय आहे त्या गावची परंपरा पाहुयात. (Live Marathi News)

Holi Festival Beed News
Accident News: ट्रॅक्‍टरवरील ताबा सुटला; नियंत्रण मिळविताना खाली पडल्‍याने मृत्‍यू

परंपरा कायम‎ ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस‎ अगोदर गावातील तरुण एकत्र येऊन‎ जावई शोध समिती नेमतात. एका‎ जावयास ताब्यात घेऊन‎ धुळवडीपर्यत निगरानीखाली ठेवले‎ जाते. धुळवडीच्या दिवशी सकाळी‎ ग्रामपंचायतीसमोर गाढव आणून‎ चपलांचे हार घालून मिरवणुकीला‎ सुरवात होते.

गावातील प्रमुख‎ रस्त्यांवरून दुपारपर्यंत मिरवणूक‎ही हनुमान मंदिरासमोर पोचते. या‎ ठिकाणी लोकवर्गणीतून जमलेल्या‎ पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा‎ आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते‎ जावयाला दिला जातो. शिवाय‎ जावईबापूला सासऱ्याच्या ऐपतीनुसार‎ सोन्याची अंगठी भेट दिली जाते.‎ विशेष म्हणजे गेल्या ९० वर्षात गावात एकोपा व सलोखा‎ आहे.

जावई शोधासाठी पथक रवाना

यंदा मात्र गेल्या ४ दिवसांपासून गावातील जवळपास २०० जावईबापू गावातून भूमिगत होत पसार झाले आहेत. त्यामुळे जावयाच्या‎ शोधात ग्रामस्थ तरुणांची ४ पथके रवाना झाली‎ आहेत.

त्यामुळे कोणता जावयाची‎ गाढवावरून धिंड निघणार? याची चर्चा सुरू आहे. तसेच हा अनोखा धुलीवंदनाचा कार्यक्रम होणार का? याकडे देखील विडा गावासह संबंध राज्याचे लक्ष लागले आहे.

अशी सुरू झाली परंपरा

बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात साधारण ७ हजार‎ लोकसंख्या आहे. गावच्या‎ वेशीजवळ दक्षिणमुखी हनुमान मंदिर‎ असून गावात साधू शिव रामपुरी‎ महाराजांची संजीवन समाधी आहे.‎ या गावाने मध्ययुगीन संस्कृतीचे दर्शन‎ घडवणाऱ्या लळीत नाट्याची परंपरा‎ १०० वर्षांपासून जपली आहे.‎

निझामकाळात गावाला जहागिरी‎ होती. १९१५ साली जहागीरदार‎ तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख‎ यांचे मेव्हणे‎ धुळवडच्या दिवशी सासुरवाडीत‎ आले होते. त्यावेळी परंपरेप्रमाणे भांग‎ पिऊन थट्टामस्करी सुरु झाली.‎ मस्करीतून जावयाची गाढवावर‎ बसून सवारी काढली. तेव्हापासून ही‎ परंपरा सुरु झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com