Bhagwan Kokare Maharaj Health Update : भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती खालवली, बेमुदत उपाेषणावर आजही ठाम

भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.
bhagwan kokare maharaj, ratnagiri
bhagwan kokare maharaj, ratnagirisaam tv

- जितेश काेळी

Ratnagiri News : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी (khed lote midc) येथे असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळेचे संचालक भगवान कोकरे महाराज (bhagwan kokare maharaj) यांचे विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बेमुदत उपोषण सुरु आहे. दरम्यान रात्री त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दोन गायींचा मृत्यू झाल्याचा धसका भगवान कोकरे महाराज यांनी घेतला असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

bhagwan kokare maharaj, ratnagiri
Mumbai Goa Highway Toll News : कोकणवासियांसाठी Good News राजापुरातील हातिवले टोलमधून सूट जाहीर; जाणून घ्या आकारणी

गोशाळेचे राखडलेले अनुदान मिळावे, गोशाळेसाठी एमआयडीसी विभागाकडून भाडेतत्वावर जमीन मिळावी, पशु संवर्धन अधिकारी बदलण्यात यावेत, गोशाळेती गायींच्या खर्चाची तरतूद शासनाकडून व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी भगवान कोकरे महाराज हे बेमुदत उपाेषणास बसले आहेत.

देशाचे पंतप्रधान हिंदू धर्माचे रक्षक आहेत. ते राम मंदिर बांधत आहेत. आता त्यांनी गोमातेची सेवा करणाऱ्या गोशाळेसाठी सुद्धा काही तरी करावे अशी अपेक्षा भगवान कोकरे महाराज यांनी व्यक्त केली आहे.

आमरण उपोषण सुरु असताना रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालवल्याने लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चेतन कदम यांनी उपोषणस्थळी धाव घेऊन भगवान कोकरे महाराज यांची तपासणी केली व त्यांना सलाईन लावले.

bhagwan kokare maharaj, ratnagiri
Nagar News : मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, रात्रीत घरं उभारली गेली (पाहा व्हिडिओ)

भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाला आज दोन दिवस पूर्ण झाले. अद्याप शासकीय यंत्रणेने त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे भगवान कोकरे महाराज यांनी आपला बळी गेल्याशिवाय सरकारी यंत्रणेला जाग येणार नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

bhagwan kokare maharaj, ratnagiri
Kolhapur News : दरोडेखोरांचा तासभर धुमाकुळ : पत्नीसह मुलाला दोरखंडाने बांधले, माजी सरपंचांच्या घरावरील दराेड्याचा थरार; कोल्हापूरहून श्वान पथक रवाना

महाराष्ट्र वारकरी संप्रदायने देखील भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाच्या आंदाेलनास पाठींबा दिला आहे. या उपोषणाची दखल शासकीय यंत्रणेकडून केव्हा घेतली जाणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com