कोविड लसीकरणाच्या 14 दिवसांनंतरही करता येणार रक्तदान

मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे ता. 14 जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे महारक्तदान शिबीर चालणार आहे.
कोविड लसीकरणाच्या 14 दिवसांनंतरही करता येणार रक्तदान
कोविड लसीकरणानंतर रक्तदान करता येतो

नांदेड : देशाचे माजी गृहमंत्री (कै.) डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त बुधवार ( ता.14 ) जुलै रोजी नांदेड महानगर काँग्रस कमिटीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधक म्हणून कोणतीही लस घेतली असेल तर लसीकरणानंतर 14 दिवसांच्या कालावधीनंतर रक्तदात्याला रक्तदान करता येते. त्यामुळे तरुणांसह नागरिकांनी या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभाग म्हणून रक्तदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी केले आहे.

मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे ता. 14 जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे महारक्तदान शिबीर चालणार आहे. महारक्तदान शिबिराच्या स्थळाची भक्ती लॉन्स येथील तयारीची पाहणी आज आ. अमरनाथ राजूरकर आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडच्या संक्रमण काळामुळे देशात रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे आणि या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

हेही वाचा - सांगलीत आमिर खानला अटक; रेमडेसिव्हरचा काळाबाजार भाेवला

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रक्तदान करता येते की नाही असा प्रश्न रक्तदात्यांना पडतो. मात्र, यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी एक निवेदन प्रसिद्धीला देऊन या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. कोरोनाच्या कोणत्याही लसीचा डोस घेतल्यानंतर 14 दिवासांचा कालावधी झाला की त्यानंतर रक्तदात्याला रक्तदान करता येते, असे या निवेदनात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांनी, तरुणांनी या महारक्तदान शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहनही आ. अमरनाथ राजूरकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले आहे.

भक्ती लॉन्स येथील महारक्तदान शिबिराच्या तयारीची पाहणी करताना काँग्रेसचे विधानपरिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, मनपा स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, तालुकाधयक्ष अ‍ॅड. निलेश पावडे, प्रवक्ते संतोष पांडागळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, नगरसेवक किसन कल्याणकर, अब्दुल गफार, संदीप सोनकांबळे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com