Kolhapur Maratha Protest: कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनात राडा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

Kolhapur Police: कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे.
Kolhapur Maratha Protest
Kolhapur Maratha ProtestSaam Tv

Kolhapur News:

मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळावे यासाठी आता राज्यभरामध्ये मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. अनेक ठिकाणी रास्तारोका, रस्त्यावर टायर जाळून आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनादरम्यान संतप्त मराठा आंदोलक आमदारांच्या घरावर दगडफेक, गाड्यांची तोडफोड करत आहेत. अशामध्ये कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांत कार्यासमोर एक दिवशी लाक्षणी उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी एसटी बसवरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला काळे फासले. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिस आणि आंदोलनांमध्ये झटापट झाली. तसंच, या उपोषणस्थळी स्टेजवरच उपोषणकर्त्यामध्ये आंदोलन करण्यावरून वादावादीचा झाल्याचा प्रकार देखील घडला.

Kolhapur Maratha Protest
CM Eknath Shinde On Maratha Reservation: मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली?... ; CM शिंदेंनी दिली महत्वाची माहिती, जरांगेंसह मराठा बांधवांना भावनिक आवाहन

तसंच, कोल्हापूर जिल्ह्यातील पाडळी खुर्द या गावामध्ये ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आजपासुन ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले. उपोषण स्थळाजवळ ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण आता तापायला सुरूवात झाली आहे. अंतरवाली सराटी या गावातून सुरू झालेले हे आंदोलन आता राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये होऊ लागले आहे.

Kolhapur Maratha Protest
Eknath Shinde: मराठा आंदोलन भरकटत चाललंय; हिंसक घटनेमागे हात कुणाचा? जाळपोळीच्या घटनांवर CM शिंदेंची प्रतिक्रिया

दरम्यान, बीडच्या माजलगावात मराठा आंदोलन चिघळलं आहे. माजलगावमधील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या बंगल्याच्या गेटवर लाथा मारल्यात. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय. धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. धाराशिव येथील शिंगोली सर्कीट हाऊसजवळील सोलापूर-धुळे महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

Kolhapur Maratha Protest
MLA Disqualification Case : ३१ डिसेंबरपर्यंत कामकाज पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com