Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मॅडमनेच विद्यार्थिनीला पाठवलं नवऱ्याच्या बेडरुममध्ये

Chhatrapati Sambhajinagar Crime News : विशेष म्हणजे या प्रध्यपकाच्याबायकोनेही मला हे मान्य असल्याचे म्हटले आहे. या संतापजनक प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे
Chhatrapati Sambhajinagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar Crime Newssaam tv

>> नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Latest News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्राध्यापकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. आम्हाला दोन मुली आहेत, आता मुलगा पाहिजे असे म्हणत एका प्राध्यापकाने विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या प्रध्यपकाच्याबायकोनेही मला हे मान्य असल्याचे म्हटले आहे. या संतापजनक प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील हा प्राध्यापक असून त्याने मुलगा पाहिजे म्हणत विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीने देखील तिला हे सर्व मान्य असल्याचे सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News
CM Eknath Shinde: अडीच वर्षे घरी बसलेल्यांनी मी दोन तीन दिवस इकडे तिकडे गेलो तर... मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

पेईंग गेस्ट म्हणून पीडितेला घरी घेऊन गेला

विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक डॉ. अशोक गुराप्पा बंडगर आणि त्याची पत्नी पल्लवी अशोक बंडगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी पीडिता शहरात आली होती. परंतु वसतिगृहात जागा देण्याऐवजी आरोपी प्राध्यापक तिला स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन गेला. घरी त्याच्या पत्नीनेही तिची मुलीसारखी काळजी घेण्याचे आश्वासन दिले. (Crime News)

जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले

दरम्यान जून 2022 मध्ये बंडगरने अनेकवेळा पीडितेची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. जुलै 2022 मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडिता झोपलेली असताना बंडगरने जबरदस्ती तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. (Chhatrapati Sambhajinagar News)

Chhatrapati Sambhajinagar Crime News
Maharashtra Politics: मुख्यमंत्री संकटकाळात देवाची धावा करत आहेत, सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना टोला

पत्नी म्हणाली, माझ्या नवऱ्यासोबत लग्न कर

जानेवारी 2023 मध्ये पीडितेने हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीला सांगितला, तेव्हा तिने हे सर्व मला मान्य आहे. तू आता घर सोडून जाऊ नकोस. माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. आम्हाला मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा असल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर बंडगरची पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत असल्याचे पीडितने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या संतापजनक प्रकरणामुळे विद्यापीठात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com