Satyajeet Tambe Suspension : सत्यजीत तांबे यांना मोठा धक्का; काँग्रेस हायकमांड कारवाई करण्याच्या तयारीत

काँग्रेस हायकमांड सत्यजीत तांबे याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याच्या तयारीत आहे,
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Saam tv

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरून राजकारण चांगलं तापलं आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली. तर दुसरीकडे डॉ. सुधीर तांबे यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यावरून राजकारण तापलं असून काँग्रेस हायकमांड सत्यजीत तांबे याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Satyajeet Tambe
Political News | नाशिक ठाकरे गट तर नागपूर काँग्रेसकडे? , पाहा सविस्तर बातमी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सत्यजीत तांबे लवकरच पक्षाकडून निलंबित होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस (Congress) हायकमांडकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच निलंबनाच्या कारवाईचं अधिकृत काढण्यात येईल.

Satyajeet Tambe
Shubhangi Patil: मोठी बातमी! ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉटरिचेबल, नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट

सत्यजीत तांबे यांच्या हायकमांडच्या कारवाईवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, 'सत्यजीत तांबे यांना हायकमांडने निलंबित केले आहे. त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. तर नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांच्या निलंबनावर चुप्पी साधली आहे.

दरम्यान, सत्यजीत तांबे यांच्या काँग्रेस हायकमांडकडून निलंबनाची कारवाई केल्यावर त्यांना भाजपकडून पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

डॉ. सुधीर तांबेंवर काँग्रेसची निलंबनाची कारवाई

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन झालेल्या प्रकारबाबत काँग्रेसने आता कठोर भूमिका घेतली आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने शिस्तभंगांची कारवाई केली आहे.

सुधीर तांबे यांनी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतली. याबाबत चौकशी देखील होणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या परवानगीने की कारवाई करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com