Congress On Nawab Malik: हेच महाराष्ट्रात चालू द्या; नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्याची मोठी प्रतिक्रिया

Vijay Vaddetiwar On On Nawab Malik: 'त्यांच्याविरोधात षडयंत्र करत त्यांना अडकण्याचा प्रयत्न केला.', असा आरोप विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.
NCP Nawab Malik
NCP Nawab Malik Saam TV

संजय डाफ, नागपूर

Congress News: मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. मलिकांना जामीन मिळाल्यानंतर राजकीय स्तरावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

अशामध्ये काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार (Congress Leader Vijay Vaddetiwar) यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नवाब मलिकांना जामीन देत सत्याचा विजय केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

NCP Nawab Malik
Nawab Malik Bail: माजी मंत्री नवाब मलिकांना 'सर्वोच्च' दिलासा! मनी लाँड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मंजूर

विजय वड्डेटीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 'सत्य परेशान हो सकता है लेकिन छूप नही सकता' अशापद्धतीने विजय वडेट्टीवार यांनी नवाब मलिक यांना जामीन मिळतात शेरोशायरीसह भाष्य केले. त्यांनी सांगितले की, 'आमच्या विरोधात आलेला आवाज आम्ही दाबल्याशिवाय राहणार नाही. याला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन देत सत्याचा विजय केला आहे. त्यांच्याविरोधात षडयंत्र करत त्यांना अडकण्याचा प्रयत्न केला.',

NCP Nawab Malik
Maharashtra Political News: मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा: नाना पटोले

विजय वड्डेटीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 'सत्य परेशान हो सकता है लेकिन छूप नही सकता' अशापद्धतीने विजय वडेट्टीवार यांनी नवाब मलिक यांना जामीन मिळतात शेरोशायरीसह भाष्य केले. त्यांनी सांगितले की, 'आमच्या विरोधात आलेला आवाज आम्ही दाबल्याशिवाय राहणार नाही. याला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन देत सत्याचा विजय केला आहे. त्यांच्याविरोधात षडयंत्र करत त्यांना अडकण्याचा प्रयत्न केला.'

NCP Nawab Malik
Gujarat Accident News: गुजरातमध्ये भीषण अपघात, २ ट्रक समोरासमोर धडकले; १० जणांचा जागीच मृत्यू

'पुरावे नसल्याने कोणत्या आधारावर विरोध करतील. अनिल देशमुखांबाबत काय पुरावे मिळाले. 100 कोटींचा आरोप केला. परमवीर सिंग मोकळा फिरत आहे. हे सगळं राजकीय आवाज दाबण्यासाठी झालं आहे.', असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. तसंच, 'नाराजी दूर करत जा, नाराज होत जा, जनतेला खड्ड्यात टाका, त्या जनतेला मरू द्या, तुम्ही आपलं नाराजी व्यक्त करा, नाराजीवर पडदा टाकत जा, हेच महाराष्ट्रात चालू द्या.', असे देखील त्यांनी सांगितले.

NCP Nawab Malik
Sanjay Raut VS Narayan Rane : संजय राऊतांकडून नारायण राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल, काय आहे प्रकरण?

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. गेल्या सात महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाला विनंती केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com