कोरोना : नांदेड जिल्ह्यात 6 लाख 23 हजार 788 ची तपासणी

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1, कंधार 1, धर्माबाद 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, मुखेड 1, लोहा 1, किनवट 1 असे एकूण 8 बाधित आढळले.
नांदेड जिल्ह्यात कोरोना तपासणी
नांदेड जिल्ह्यात कोरोना तपासणी

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 866 अहवालापैकी 8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे 5 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 305 एवढी झाली असून यातील 88 हजार 741 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 61 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1, कंधार 1, धर्माबाद 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, मुखेड 1, लोहा 1, किनवट 1 असे एकूण 8 बाधित आढळले.

हेही वाचा - बाबुराव कदम यांनी बंडखोरी केली तरी ते जनाधार असणारे शिवसैनिक होते. हे निकालाने सिद्ध केले होते. याच कारणामुळे कोहळीकर यांनी पक्षातील वरिष्ठांशी स्नेहसंबंध कायम ठेवले असावेत

गुरुवारी जिल्ह्यातील 11 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, खाजगी रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1,मनपा अंतर्गत एनआरआय भवन, गृह विलगीकरण व जम्बो कोविड सेंटर मधील 7 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

गुरुवारी 61 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, किनवट कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 23, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालय 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 23 हजार 788

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 20 हजार 732

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 305

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 741

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.19 टक्के

गुरुवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

गुरुवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

गुरुवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-76

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-61

गुरुवारी रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com