Daund News
Daund NewsSaam tv

Daund News: डीजे बंद करण्यास सांगण्यासाठी गेलेल्‍या पोलिसांना धक्‍काबुक्‍की; रात्री दोनपर्यंत सुरू होता डीजे

डीजे बंद करण्यास सांगण्यासाठी गेलेल्‍या पोलिसांना धक्‍काबुक्‍की; रात्री दोनपर्यंत सुरू होता डीजे

दौंड : दौंड शहरात मध्यरात्री दोन वाजेपर्यंत डीजेवर गाणी वाजवत हुल्लडबाजी सुरू होती. या दरम्‍यान डीजे बंद करण्यास सांगण्यासाठी गेलेल्या (Police) पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार झाला. यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

Daund News
Dhule News: ४२ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ३७९६ अर्ज दाखल

दौंड (Daund) शहरात आज (२ जानेवारी) मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्‍या सुमारास हा प्रकार घडला. दौंड- सिध्दटेक अष्टविनायक मार्गावर छत्रपती संभाजी स्तंभासमोर डीजेवर गाणी लावून हुल्लडबाजी करत काहीजण नाचत होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्‍या आवाजाने नागरीक त्रस्त झाले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर रात्रीच्‍या गस्त पथकाला तेथे पाठविण्यात आले होते.

पोलिसांशी हुज्‍जत

पोलिस पथकाने डीजे बंद करण्यास सांगितले असता आनंद अण्णाराव जाधव व अनोक शाम जाधव (दोघे रा. गोवा गल्ली, दौंड) यांनी पथकासमवेत हुज्जत घातली. डीजेचा आवाज बंद करण्यास नकार देत त्यांनी गोंधळ घातला. डीजे बंद करण्याऐवजी त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत मोठ्याने आरडाओरड केली.

दोन्ही संशयित फरार

दौंड पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक सुरेश दत्तात्रेय चौधरी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपी फरार असून दौंड पोलिसांनी डीजे चालकावर कारवाई टाळली आहे. संशयित आरोपी आनंद जाधव याच्याविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात यापूर्वी दोन फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com