ऑफर लेटर घेऊन थाेडीच फिरत असताे; फडणवीसांचा मुश्रीफांना टाेला

hasan mushrif devendra fadanvais
hasan mushrif devendra fadanvais

गाेवा : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल एखादा व्यक्ती भ्रष्टाचारा विराेधात तक्रार करण्यासाठी पाेलिसात तक्रार करण्यास निघाला असताना पाेलिस त्याला अडवितात. ज्या ठिकाणी ज्याच्या विराेधात तक्रार करण्यासाठी जाणार आहेत तेथील त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील म्हणून तुम्हांला जाता येणार नाही असे कारण पाेलिसांकडून सांगितले गेले. स्वतंत्र भारतात अशा प्रकारची कायदा व सुव्यवस्था पाहयला मिळाली नाही. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. हा सर्व प्रकार भयानक असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भाजप नेते किरीट साेमय्या यांच्यावरील कराड येथे करण्यात आलेल्या कारवाई बाबत नमूद केले. devendra-fadanavis-kirit-somaiya-maharashtra-kolhapur-karad-police-sml80

भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज (साेमवार) गोव्यात आले आहेत. विमानतळावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान फडणवीस यांनी किरीट साेमय्या यांच्यावरील कारवाई चुकीचे असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जर याबाबत माहिती नसेल तर त्यांनी दखल घ्यावी असे फडणवीसांनी नमूद केले.

hasan mushrif devendra fadanvais
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

फडणवीस म्हणाले चुकीच्या गाेष्टी भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही. सातत्याने भ्रष्टाचार विराेधात आमची लढाई सुरु राहील. मुख्यमंत्र्यांना या कारवाईबाबत माहिती नसेल तर त्यांनी यामध्ये दखल घेऊन तातडीने चुकीची कारवाई थांबवावी असेही फडणवीस यांनी नमूद केले.

मला भाजपने आॅफर दिली पक्षात यायची पण मी गेलाे नाही त्यामुळे माझ्यावर आराेप केले जाताहेत असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे यावर फडणवीसांनी काेणी आॅफर दिली मुश्रीफांना असा प्रतिप्रश्न करीत असे आॅफर लेटर घेऊन आम्ही थाेडीच फिरत असताे. असे आमचे आॅफर लेटेर काेठेही मैदानात पडलेले नाहीत काेणालाही द्यायला असा टाेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ hasan mushrif devendra fadanvais यांना लगावला.

दरम्यान फडणवीस हे गाेव्यातील मंत्री व आमदारांशी पणजीत आगामी काळातील निवडणुक आणि व्यूहरचना याबाबत चर्चा करुन माहिती घेणार आहेत. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते मराठा समाज सभागृहात संवाद साधणार आहेत. रात्री उशिरा गाभा समितीच्या बैठकीत ते महत्त्वाची चर्चा करणार आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com