धुळे नंदुरबार DCC त 'महाविकास' नऊ, भाजपास आठ जागा

बॅंकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. यापुर्वी सहा जागांवर भाजपा पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल विजयी झाले. एका जागा शिवसेनेने पटकाविली आहे.
धुळे नंदुरबार DCC त 'महाविकास' नऊ, भाजपास आठ जागा
dhule nandurbar dcc bank logo

धुळे : धुळे- नंदुरबार (dhule) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपला आठ तर अन्य नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (ncp), काँग्रेस व शिवसेनेने जागा पटकाविल्या आहेत. या बॅंकेच्या निवडणुकीत यंदा खासदार सुभाष भामरे गटास पराभवचा धक्का बसला आहे. dhule nandurbar election result 2021 latest news

dhule nandurbar dcc bank logo
लातूर DCC त नाणेफेकीवर भाजपचा उमेदवार जिंकला; काॅंग्रेस सत्तेत

धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या मतमाेजणीस आज (साेमवार) सकाळी प्रारंभ झाला. भाजपाचे प्राबल्य असलेल्या या बँकेवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या माध्यमातुन विरोधी गट निवडणुकीच्या रिंगणात उतरला हाेता. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत.

दरम्यान बॅंकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांपैकी सात जागा यापुर्वी बिनविरोध झाल्या आहेत. यापुर्वी सहा जागांवर भाजपा पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. एका जागा शिवसेनेने पटकाविली आहे. आज घाेषित करण्यात आलेल्या विजयी उमेदवारांमध्ये भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे हर्षवर्धन दहिते, राजेंद्र देसले यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलमधून चंद्रकांत रघुवंशी, संदीप वळवी, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचा समावेश आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com