New Year 2023: मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३३ जणांवर कारवाई

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ३३ जणांवर कारवाई
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पोलिसांतर्फे (Traffice Police) बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यात ३३ वाहन चालकांवर पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे. (Breaking Marathi News)

Dhule News
Dhule News: शेतात काढून ठेवलेला कापूस चोरी; भाव नसल्‍याने केली आहे साठवणूक

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक पोलिसातर्फे बेशिस्त वांधारकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. यामध्ये धुळे शहरातील विविध ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे ग्रस्त घालण्यात आलेली होती. यादरम्यान मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या 33 वाहन चालकांवर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

अन्‍य कारवाईचाही बडगा

बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या 6 बेसिस्त बुलेट धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर वाहन चालवताना कानाला फोन लावून वाहने चालवणाऱ्या आठ वाहनधारकांवर देखील कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या बारा वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर बिना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 15 दुचाकी धारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com