Dhule News: दहिवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव पाडला बंद; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको

दहिवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव पाडला बंद; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Dhule News Farmer
Dhule News FarmerSaam tv

धुळे : साक्री तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे संतप्त (farmer) शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bajar Samiti) बाहेर असलेल्या दहिवेल-पिंपळनेर रस्त्यावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. (Tajya Batmya)

Dhule News Farmer
Eknath Shinde Banner: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना– भाजपमध्ये धुसफुस; स्‍वागत बॅनरमधून देवेंद्र फडणवीस यांना वगळले

कांद्याला अपेक्षीत दर मिळत नाही. बाजार समितीमध्‍ये अगदी कमी दरात कांद्याची (Onion) खरेदी केली जात आहे. यामुळे कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्‍यान आज साक्री तालुक्यातील दहिवेल येथील कांदा मार्केटमध्‍ये कांदा विक्रीसाठी आलेल्‍या कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले.

Dhule News Farmer
Akola News: धक्कादायक! अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

वाहतुकीचा खोळंबा

शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघावयास मिळाले. साक्री तालुक्यातील दहिवेल येथील कांदा मार्केट येथे कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे आक्रमक झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com