Dhule News: मुंबई-आग्रा महामार्गावरील काच दुकानाला भीषण आग; आगीत लाखोंचे नुकसान

शॉक सर्किटमध्ये आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Dhule News
Dhule NewsSaam TV

भूषण अहिरे

Dhule News: धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील काच दुकानाला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. (Latest Bhule News)

आगीच्या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांतर्फे अग्निशमन विभागाच्या पथकास देण्यात आल्यानंतर, अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जवळपास सात ते आठ अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल करण्यात आलेत. आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न अग्निशमन विभागाच्या जवानांतर्फे करण्यात येत आहे.

Dhule News
Mumbai Fire News : मुंबईच्या धारावीत भीषण आग; एका महिलेचा मृत्यू

या दुर्घटनेमध्ये अद्याप कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दुकानाचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शॉक सर्किटमध्ये आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com