Dhule Rain News: सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची पुन्‍हा हजेरी

Dhule Weather Report: सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची पुन्‍हा हजेरी
Dhule News Rain
Dhule News RainSaam tv

धुळे : साक्री तालुक्यासह शिंदखेडा तालुक्यामध्ये देखील अवकाळी (Shindkheda) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी (Rain) पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. (Maharashtra News)

Dhule News Rain
Solapur Crime News: धक्कादायक प्रकार..कौटुंबिक वाद विकोपाला, नवऱ्याने पत्नीचा कानच उपटून काढला

हवामान विभागाकडून राज्‍यातील काही भागात आगामी तीन– चार दिवस अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. त्‍यानुसार राज्‍यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून वातावरणात देखील बदल झाला असून उन्‍हाची तिव्रता कमी होवून ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे हवेत देखील काहीसा गारवा असल्‍याचे जाणवत आहे.

Dhule News Rain
Dhule News: ट्रकमध्‍ये दगड भरून केले वजन; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक, व्यापाऱ्यास दिला चोप

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारच्या सुमारास साक्री तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर शिंदखेडा तालुक्यात देखील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकाला देखील फटका बसण्याची दाट भीती शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com