Dhule Congress News: काँग्रेसच्यावतीने धुळ्यात रास्ता रोको; खासदारकी रद्दचा केला निषेध

काँग्रेसच्यावतीने धुळ्यात रास्ता रोको; खासदारकी रद्दचा केला निषेध
Dhule Congress News
Dhule Congress NewsSaam tv

धुळे : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर याचा निषेध करण्यासाठी धुळ्यात काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. (Dhule News) धुळ्यात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून याचा निषेध केला आहे. (Maharashtra News)

Dhule Congress News
Harshvardhan Jadhav: चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटात जायचे होते मात्र..; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा गौप्यस्फोट

सुरत न्‍यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. तसेच उच्‍च न्‍यायालयात अपील करण्याची देखील मुभा दिली होती. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय आज झाला. या निर्णयानंतर कॉंग्रेसच्‍यावतीने निषेध व्‍यक्‍त करत ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.

Dhule Congress News
Prakash Ambedkar: द्वेष भावनेतून राहुल गांधींची खासदारकी रद्द; प्रकाश आंबेडकर

मोदींविरोधात घोषणाबाजी

काँग्रेस भवन समोरील रस्त्यावर बसून या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून धरला. "मोदी हटाव देश बचाव" अशा प्रकारची घोषणाबाजी करून मोदी सरकारचा निषेध केला आहे. या रास्ता रोको दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे देखील बघावयास मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com