Dombivli News : शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यासह मुलाला बेदम मारहाण; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivli Crime : शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आणि तिच्या मुलाला एका बिल्डरने बेदम मारहाण केली आहे.
Dombivli Crime News
Dombivli Crime News Saam TV

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Dombivli Crime News : डोंबिवली शहरातून एक धक्कादायक समोर आली आहे. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आणि तिच्या मुलाला एका बिल्डरने बेदम मारहाण केली आहे. इतक्यावर हा बिल्डर थांबला नाही, तर त्याने या महिला कार्यकर्त्याच्या गाडीची सुद्धा तोडफोड केली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

Dombivli Crime News
Pune Koyata Gang : मैत्रिणीला भेटायला आला अन् फसला, कोयता गँगचा म्होरक्या पुणे पोलिसांच्या ताब्यात

बाळू भोईर आणि त्याचा मुलगा अनिकेत भोईर, असं गुन्हा (Crime News) दाखल केलेल्या संशयित आरोपींचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने डोंबिवली पश्चिमेकडील एका इमारतीमध्ये घर घेतलं होतं. मात्र हे घर व इमारत अनधिकृत असल्याचं महिलेला कळालं.

माहिती मिळताच महिलेने पैसे परत देण्याचा तगादा बिल्डरकडे लावला. दोन दिवसांपूर्वी या महिलेने विकत घेतलेल्या फ्लॅटवर बिल्डरने आपल्या मुलाची नेमप्लेट लावली होती. पीडित महिलेने याचा जाब बिल्डरला विचारला. त्यामुळे संतापलेल्या बिल्डर व त्याच्या मुलाने पीडित महिलेला मारहाण केली इतकेच नव्हे तर तिच्या गाडीची तोडफोड केली.

Dombivli Crime News
Uday Samant News : पाणी कुठून चोरी करू? बदनामी करू नका; उद्योगमंत्र्यांच्या धाडीनंतर ग्रामस्थांचा आक्रोश

यावेळी आईला वाचवण्यास आलेल्या त्याच्या मुलाला देखील बिल्डर व त्याच्या साथीदाराने मारहाण केली .या प्रकरणी विष्णूनगर पोलीस (Police) ठाण्यात बाळू भोईर व त्याचा मुलगा अनिकेत भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विष्णू नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com