पर्यावरणपूरक विवाह सोहळा : जिंतूरमध्ये वधू- वराना फळझाडांची रोपे भेट

दोन दिवसापूर्वी (ता. तीन) शहरातील माऊली मंगल कार्यालयात पंढरीनाथ बुधवंत यांचा मुलगा गोविंद याचा विवाह अंबरवाडी येथील सुधाकरराव कांदे यांची मुलगी पूजा हिचा विवाह संपन्न झाला.
जिंतूर मध्ये पर्यावरणयुक्त लग्नसोहळा
जिंतूर मध्ये पर्यावरणयुक्त लग्नसोहळा

जिंतूर (जिल्हा परभणी) : विवाह सोहळा म्हटले की, विद्युत रोषणाई, आतषबाजी, वाद्यवृंद, सोहळ्यास उपस्थित व्हिआयपींचे शाल, हारतुऱ्यांनी स्वागत या गोष्टीं दिसून येतात. परंतु अलीकडे वधू- वरासह यजमानाच्या विचारात झालेला बदल, त्यात निसर्गाने कोरोना काळात पर्यावरणाचे संतुलन बिघडले असल्याचे दाखवून दिल्याने भर पडली असल्याचे येथील एका लग्न सोहळ्यात दिसून आले.

दोन दिवसापूर्वी (ता. तीन) शहरातील माऊली मंगल कार्यालयात पंढरीनाथ बुधवंत यांचा मुलगा गोविंद याचा विवाह अंबरवाडी येथील सुधाकरराव कांदे यांची मुलगी पूजा हिचा विवाह संपन्न झाला. दोघांच्या पालकांकडून अनावश्यक खर्चाला बाजूला सारुन पर्यावरणाचे संतुलन राखण्याहेतू नवदांम्पत्यास आंबा, चिंच, नारळ, फणस, रामफळ, सिताफळ, कवठ या उपयुक्त फळझाडांची तीस रोपे भेट देऊन पर्यावरणपूरक लग्न पार पाडले.

हेही वाचा - रविवारी २४६ जणांची अँटीजन टेस्ट केली. यामध्ये हिंगोली परिसर १५७, कळमनुरी ८६ तर सेनगाव चार अश्या एकूण २४६ नागरिकांची अँटीजन तपासणी केली असता एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

शेतकऱ्यांच्या जीवनातील नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ निवारणासाठी प्रा. अण्णासाहेब जगताप हे मागील काही वर्षापासून राबवित असलेल्या

एक मुल तीस झाडे अभियानातंर्गत शेती, माती, झाड तथा एकूणच निसर्गाविषयी समाजोपयोगी संकल्पना कृतित उतरवल्या जातात. त्यातील एक संकल्पना म्हणजे लग्नसोहळ्यात वायफळ खर्च टाळून पर्यावरण आणि शेतकरी उपयोगाच्या शेतमालाचा जास्तीतजास्त वापर करणे होय. त्यामुळे हा पर्यावरणपूरक विवाह चर्चिला जात आहे.

या विवाह सोहळ्याप्रसंगी बुधवंत परिवारासह आमदार मेघना बोर्डीकर, अण्णासाहेब जगताप, प्रा. बाळू बुधवंत, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख उपस्थित होते. त्यानांही झाडांची रोपे भेट देण्यात आली.

येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यातील मनाठा पोलिस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले व दोन्ही माळरानाच्या मध्यभागी वसलेले माळझरा (ता. हदगांव) गाव आहे.

कोरोनाच्या काळात सर्वांना प्राणवायूचे महत्त्व समजले. त्यामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरावा. यातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लागण्यासोबतच प्राणवायू करिता मदत होईल.

- नवरदेव गोविंद

आजच्या परिस्थितीचा विचार करता लग्न सोहळ्यांचा प्रचंड खर्च वाढला आहे. वायफळ खर्च करणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. गरज नसतांना लाखो रुपयांच्या अनावश्यक वस्तू नवदांम्पत्यास देऊन लग्नसोहळ्यात देखाव्यासाठी मांडल्या जातात. ज्या पाच- दहा वर्षात खराब होतात. परंतु अश्यावेळी आंदण म्हणून दीर्घकाळ टिकणारी फळझाडे नवदांम्पत्यास भेट दिल्यास झाडांचे संगोपन होऊन झाडांचे उत्पादन सुरु होते. ते पुढील पाच पिढ्यांपर्यंत सुरूच राहते. सोबतच पर्यावरणाचे संतुलनही राखले जाते.

- प्रा. अण्णासाहेब जगताप, एक मुल- तीस झाडे अभियान

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com