Nashik Crime : ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा; वादावादीत गोळीबार? VIDEO व्हायरल

एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार सुद्धा केल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
Thackeray Group vs Shinde Group Nashik Clash
Thackeray Group vs Shinde Group Nashik ClashSaam TV

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. या वादात एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार सुद्धा केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

Thackeray Group vs Shinde Group Nashik Clash
Pandharpur News : पेपर लिहताना तिसरीच्या विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

प्राप्त माहितीनुसार, नाशकातील (Nashik) देवळाली गावात ही घटना घडली आहे. येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले होते. तर याच ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा होते. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली.

या बाचाबाचीतून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. क्षणार्धात तणाव इतका वाढला, की यातील एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या बैठकीवेळी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली यावरून दोन्ही गट आमनेसामने आले. यातून एका गटाने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Political News)

Thackeray Group vs Shinde Group Nashik Clash
VIDEO : CM शिंदे कानात बोलताच PM मोदी खळखळून हसले; नेमकं काय घडलं?

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे. या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्ते निघून गेल्यानं तणाव निवळला आहे. दरम्यान, नेमका कोणत्या गटाने गोळीबार केला? या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com