Latur News: डिजिटल शिक्षण कसे मिळणार? ; ३१० शाळांचा वीजपुरवठा बंद !

जिल्ह्यात २ हजार १२२ शाळा असून, यामध्ये ३१० शाळांचा वीज पुरवठा बंद असून, १०५ शाळांचे मीटर काढून नेलेले आहे.
Latur News
Latur NewsSaam TV

दीपक क्षिरसागर

Latur News: शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे धडे देण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळांमध्ये संगणक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील ३१० शाळांचा वीजपुरवठा बंद आहे. तर १५८ शाळांचा वीजपुरवठा खंडित आहे. परिणामी, या शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित आहेत. (Latest Latur News)

लातूर जिल्ह्यात २ हजार १२२ शाळा असून, यामध्ये मनपा, जि. प., खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. यापैकी सध्या १ हजार ७५९ शाळांचा वीज पुरवठा सुरळीत आहे. तर १०५ शाळांनी थकीत वीजबिलाचा भरणा न केल्याने महावितरणने विद्युत मीटर काढून नेले आहे. तर वीजबिल न भरल्याने १५८ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळांकडे महावितरणची ३५ लाख १४ हजार ३७ रुपयांची थकबाकी असून, शाळांना महिन्याकाठी सरासरी ९ लाख ५० हजार रुपयांचे वीजबिल येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शाळा स्तरावरच वीज बिल भरण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

Latur News
Latur News: वॉटर ग्रीडमधून ३८ गावांची भागणार तहान; ४८१ कोटींच्या योजना प्रकल्पाला वेग

जिल्ह्यात २ हजार १२२ शाळा असून, यामध्ये ३१० शाळांचा वीज पुरवठा बंद असून, १०५ शाळांचे मीटर काढून नेलेले आहे. तर बिल न भरल्यामुळे १५८ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आतापर्यंत ३५ लाख रुपयांचे वीजबिल शाळांकडे थकीत असून, प्रतिमहा ९ लाख रुपयांची बिले येतात. वीजबिल भरणा करण्यासाठी शाळास्तरावर सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, महापालिका, खासगी अनुदानित शाळांकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जि. प.च्या शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com