चांगली बातमी : नांदेड जिल्ह्यातील 600 युवकांना मिळणार प्रशिक्षण

कोविडमुळे वैद्यकीय क्षेत्रात विविध मनुष्यबळाची निर्माण झालेली गरज लक्षात घेवून आवश्यक असलेली तंत्र कुशलता इच्छूक विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नांदेड : कोविडमुळे वैद्यकीय क्षेत्रात विविध मनुष्यबळाची निर्माण झालेली गरज लक्षात घेवून आवश्यक असलेली तंत्र कुशलता इच्छूक विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.

तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणार्थी उमेदवार उपस्थित होते.

हेही वाचा - बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना होणारा त्रास बघता ग्राम पंचायत निवघा बा. यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हदगांव यांना रस्ता व नाल्या दुरुस्ती करण्यासाठी दोनवेळा लेखी पत्र देवून रस्ता दुरुस्तीची मागणीसुद्धा करण्यात आली.

हे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता विभागातर्गंत महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा प्रशिक्षण केंद्र म्हणून समावेश करण्यात आला आहे. यानुसार नांदेड जिल्ह्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याच बरोबर एसजीजीएस स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड, शासकीय महिला रुग्णालय शामनगर नांदेड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड आणि क्रिसेंट ब्लड सेंटर येथे हे प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक केंद्रावर वेगवेगळया विषयाचे प्रशिक्षण पुढीलप्रमाणे आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे 12 विज्ञान शाखेसाठी एमरजंसी मेडीकल टेक्निशीएन बेसीक, फ्लेबोटॉमीस्ट मेडिकल, रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन आठवी उत्तीर्ण युवकांसाठी जनरल ड्यूटी असिस्टंट आदी पदांचे प्रशइक्षण देण्यात येणार आहे.

येथे क्लिक करा - माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमामध्ये बुलढाणा जिल्हा अग्रेसर

एसजीजीएस स्मारक शासकीय रुग्णालय येथे 12 विज्ञान युवकांसाठी सेंन्ट्रल स्ट्राइल सर्व्हिस डिपार्टमेंट असिस्टंट, हॉस्पीटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर, मेडिकल रिकॉर्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन तसेच आयटीआय डीप्लोमा क्षेत्राशी मेडिकल इक्युपमेंट टेक्नालॉजी असिस्टंट.

शासकीय महिला रुग्णालय श्यामनगर नांदेड 12 वी फ्लेबोटॉमीस्ट, 12 विज्ञानसाठी मेडिकल रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन, 10 वीसाठी जनरल ड्यूटी असिस्टंट-ॲडव्हॉन्स, सॅनेटरी हेल्थ ॲड, ड्रेसर (मेडीकल), आठवीसाठी जनरल ड्यूटी असिस्टंट तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय वजिराबाद येथे 12 वी साठी योगा वेलनेस ट्रेनर, योगा थेरपी असिस्टंट, पंचकर्मा टेक्निशियन, 10 वीच्या युवकांसाठी क्षारा कर्मा टेक्निशियन, कूपिंग थेरपी असिस्टंट, आयुर्वेदा आहार ॲन्ड पोशक सहायक, आठवीच्या युवकांसाठी असिस्टंट योगा इंन्स्ट्रक्टर, बीएएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदा डायटीशीयन तर द क्रिसेंट ब्लड सेंटर येथे 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल डयुटी असिटंट (ॲडव्हान्स) या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण होणार आहे.

नांदेड येथून या कार्यक्रमास डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयचे डॉ. पी. टी. जमदाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. आय. एफ. ईनामदार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, शासकीय आर्युवेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, डॉ. शितल चव्हाण तसेच संबंधित सर्व कोर्सेसचे प्राध्यापक व सहायक प्राध्यापक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, गौरव इंगोले, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक इरफान खान, राहुल गजभारे, विरेंद्र चव्हाण, रजाक सय्यद हे उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com