Good News : आर्यन देशमुख चिकाळेकर भारतीय युद्ध नौकेत लेफ्टनंटपदी
मुदखेडचा आर्यन देशमुख भारतीय नौसेनेत लेफ्टनन्ट

Good News : आर्यन देशमुख चिकाळेकर भारतीय युद्ध नौकेत लेफ्टनंटपदी

आता आर्यन देशमुख यास भारतीय सैन्याला उच्च दर्जाचे अधिकारी देणारी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्थेत 146 या अभ्यासक्रमासाठी पहिल्याच प्रयत्नात निवड झाली.

मुदखेड ( जिल्हा नांदेड ) : मुदखेड येथील आर्यन भगवानराव देशमुख चिकाळेकर हा सैनिक स्कूल सातारा येथे शिक्षण घेत असून या युवकाची निवड यूपीएससीच्या माध्यमातून झाली होती. सदरील परीक्षा ही फेब्रुवारी 2021 मध्ये पार पडली होती. या परीक्षेस देश पातळीवरुन हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये आर्यन देशमुख यांचा 250 वा क्रमांक होता. नुकतीच या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी व मुलाखती पार पडल्या असून या चाचणीचा निकाल ता. सहा जूलै रोजी लागला असून यामध्ये देखील आर्यन देशमुखला 250 वा रँक मिळाला आहे.

आता आर्यन देशमुख यास भारतीय सैन्याला उच्च दर्जाचे अधिकारी देणारी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्थेत 146 या अभ्यासक्रमासाठी पहिल्याच प्रयत्नात निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)मार्फत देशपातळीवर घेण्यात आलेल्या परिक्षेत सहा लाख परीक्षार्थी मधून 250 वा ऑल इंडिया रॅंक मिळवून उतीर्ण झाला.

हेही वाचा - हिंगोली ते वाशिम मार्गावर काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या राशनच्या धान्यासह १३ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

आर्यनचे शालेय शिक्षण न्यू व्हिजन पब्लिक स्कूल अंबाजोगाई व सैनिक स्कूल सातारा येथे झाले 2020 साली पणजी ( गोवा ) येथे देशपातळीवर घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत व फेब्रुवारी 2021 ला भोपाळ येथे SSBइंटरव्ह्यू व वैद्यकीय चाचणीद्वारे 250 वा ऑल इंडिया रॅंक मिळवून एनडीएत निवड झाली.

तीन वर्षे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय नौसैनेत अधिकारीपदी रुजू होईल. या यशाबद्दल सैनिक स्कूल साताराचे प्राचार्य ग्रुप कॅप्टन श्री. घोरमाडे, मुख्याध्यापक विगं कमांडर बी. लक्ष्मीकांत, श्री. दतात्री, अंबाजोगाई येथील योगेश्वरी शाळेचे शिवहर ढगे, यशोतेज ॲकॅडमी पूणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आर्यन देशमुख यांच्या निवडीबद्दल मुदखेड तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल मुदखेड येथील विविध पक्ष संघटना व सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आर्यन यांचे वडील भगवान देशमुख चिकाळेकर व आर्यन देशमुख यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com