Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली, शरद पवारांवर बोलताना म्हणाले...

Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेत बोलताना पडळकरांची जीभ घसरली.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkarsaam tv

>>भूषण अहिरे

Gopichand Padalkar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. 'शरद पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने पाठीत खंजीर खुपसल्याने काळवंडला होता, फडणवीसांनी एकच वाक्य टाकल्यामुळे पवारांचा मूळचा काळवंडलेला चेहरा आता डांबरा सारखा काळा झाला', असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे.

धुळ्यात कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कोळी समाजाची सभा पार पडली. या सभेत गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांविषयी बोलताना जीभ घसरली.

Gopichand Padalkar
SSC HSC Exam: दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेत वेळ वाढवून मिळणार

राज्यात विविध जमातींच्या विविध प्रश्नांवरती पवारांनी घाण आणि निच राजकारण केले असे पडळकर म्हणाले. आदिवासी जमातीसह 33 जमातींवर अन्याय करायला पवारांनी काही लोक जवळ ठेवली होती आणि ती आदिवासी जमातीचीच होती. धनगर समाजाच्या आरक्षणास विरोध करणारे लोक देखील पवारांच्या जवळचेच होते. या सर्वांचा सूत्रधार एक आहे. शरद पवारांनी हे घाण आणि निच काम केले अशा शब्दात पडळकर यांनी पवारांवर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

'पवार, राऊत फाटक्या नोटा'

सरकार पडणार असे म्हणणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार आणि संजय राऊत या जीर्ण झालेल्या फाटक्या नोटा आहेत. या चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, सरकार फुल स्ट्रॉंग आहे, असे पडळकर म्हणाले.

Gopichand Padalkar
Shivjayanti In Agra : आग्रा किल्ल्यात 'जय शिवाजी, जय भवानी' जयघोष घुमणार! शिवजयंती साजरी करण्यास अखेर परवानगी

मंत्री विजयकुमार गावित यांना घरचा आहेर

आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर आदिवासी विकास मंत्रीच गौड बंगाल करत असल्याचा आरोप करत पडळकरांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना घरचा आहेर दिला आहे. भाजपच्या आमदारांना त्यांच्याच मंत्र्यांवर विश्वास राहिला नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Latest Political News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com