'मदत जाहीर करुन सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली'

'मदत जाहीर करुन सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली'
harshvardhan patil

बारामती : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत तुटपुंजी असल्याचे मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे नमूद केले. harshvardhan-patil-demands-more-funds-for-flood-affected-area-farmers-maharashtra-government-help-sml80

harshvardhan patil
Rally of Himalayas : तनिका शानभागची चमकदार कामगिरी

हर्षवर्धन पाटील म्हणाले राज्य सरकारने जिरायती भागासाठी दहा हजार प्रति हेक्‍टर व बागायती भागासाठी पंधरा हजार रुपये प्रतिहेक्‍टर रुपये मदत जाहीर केली आहे. मात्र शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असून काही शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरवडून गेल्या आहेत.

त्यात पुढील दोन वर्षे कोणतेही पीक घेता येणार नाही. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा पुनर्विचार करावा अशी मागणीही श्री. पाटील यांनी केली आहे.

दरम्यान भाजपात प्रवेश केल्याने शांत झोप लागते या माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला असून त्याठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांच्या भाषणातील एका वक्तव्यावर मी तसे उत्तर दिले होते असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले मात्र त्याचा विपर्यास केला गेला असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.