हिंगोली : आंबा येथील भुयारी मार्ग तात्काळ मोकळा करा- हेमंत पाटील
खासदार हेमंत पाटील अंबा भुयारी पुलाची पाहणी करताना

हिंगोली : आंबा येथील भुयारी मार्ग तात्काळ मोकळा करा- हेमंत पाटील

मागील बऱ्याच दिवसापासून आंबा चोंडी येथील रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न प्रलंबित असून मार्ग तयार करताना रेल्वे प्रशासनाने कोणताही पर्यायी मार्ग काढला नव्हता आणि त्याचे पडसाद पहिल्याच दमदार झालेल्या पावसात दिसून आले.

पंजाब नवघरे

वसमत (जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील आंबा चोंडी स्टेशनजवळ कुरुंदा रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. या ठिकाणच्या पाण्याचा बंदोबस्त न केल्याने रविवारी झालेल्या पावसामुळे पुलाखाली पाणी साचून त्यास तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिणामी रहदरीसाठी असलेला एकमेव मार्ग बंद झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली व भुयारी मार्ग मोकळा करुन वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

मागील बऱ्याच दिवसापासून आंबा चोंडी येथील रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न प्रलंबित असून मार्ग तयार करताना रेल्वे प्रशासनाने कोणताही पर्यायी मार्ग काढला नव्हता आणि त्याचे पडसाद पहिल्याच दमदार झालेल्या पावसात दिसून आले. यापूर्वी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी याठिकाणी पाहणी करुन पर्यायी रस्ता करुन देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने रविवारी झालेल्या पावसाने पुलाखाली पाणी साचल्याने आंबा चोंडी ते कुरुंदा हा प्रमुख मार्ग बंद झाला आहे.

हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे लपून वास्तव्य करत असलेल्या आरोपीला पकडण्यात सिंदखेड पोलिसांना यश आले.

याबाबत ग्रामस्थांनी खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करुन याठिकाणी साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच पर्यायी मार्गावर भराव टाकून रस्ता तात्काळ मोकळा करावा आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी संबंधित कंत्रातदाराने घ्यावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. यावेळी सरपंच संदीप भोसले, उपसरपंच सुनील भोसले, बबन भोसले, शिवाजी भोसले, बंडू भोसले, दिनकर भोसले, बबन बालगुडे, राजेश भोसले, यादव शिंदे, काशिनाथ भोसले, पंजाब भोसले, संजय भोसले आदींची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com