Beed News: मोठी बातमी! बीडमध्ये रात्री 10 नंतर हॉटेल्स, दुकानं बंद राहणार; जाणून घ्या काय आहे कारण

मोठी बातमी! बीडमध्ये रात्री 10 नंतर हॉटेल्स, दुकानं बंद राहणार; जाणून घ्या काय आहे कारण
Hotels and shops will be closed after 10 pm in Beed
Hotels and shops will be closed after 10 pm in BeedSaam Tv

Beed Latest News: बीडमधील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बीड शहरात रात्री 10 नंतर एकही दुकान, हॉटेल अथवा इतर आस्थापना उघड्या ठेवू नयेत, असे आवाहन बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

रात्री 10 नंतर पोलिसांकडून गस्त सुरू करून दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी बीड शहरात किरकोळ वादामधून जातीय वळून देण्याचा प्रयत्न केला होता.

Hotels and shops will be closed after 10 pm in Beed
Shivsena Leader on BJP: 'आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे', शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याचं मोठं वक्तव्य

यामुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेनुसार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रात्री 10 नंतर जिल्ह्यातील हॉटेल, दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Latest News Update)

Hotels and shops will be closed after 10 pm in Beed
Political News : लोकसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना देखील हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या सूचनेचे पालन केले नाही, तर दंड अथवा थेट फौजदारी कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान या निर्णयाचे काही लोकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी विरोध केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com