Jalgaon News: संकेतस्‍थळावरून विवाह जुळवणी महागात; तरूणाची १० हजारात फसवणूक

संकेतस्‍थळावरून विवाह जुळवणी महागात; तरूणाची १० हजारात फसवणूक
Jalgaon News Marriage
Jalgaon News MarriageSaam tv

मेहुणबारे (जळगाव) : उदगिर (जि. लातुर) येथील अनाथ आश्रमातील मुली विवाहेच्छुक आहेत. अशी जाहीरात विवाह (Marriage) जुळवणाऱ्या संकेत स्थळावरून केली गेली. त्या अमिषाला बळी पडून उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील उपवर तरुणाची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

Jalgaon News Marriage
Sushma Andhare: आजही माझ्या घरावर कमळ कोरलेलं; सुषमा अंधारे सांगितले कमळासोबतचं नातं

विवाह जुळवणीच्या नावाखाली या संकेतस्थळ चालवणाऱ्या महिला संचालिकेने या तरुणापासून ऑनलाईन सुमारे १० हजार रूपये घेतले. या तरूणाला ना मुलगी मिळाली, ना घेतलेले पैसे परत मिळाले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठून फसवणुकीचा प्रकार पोलीसांच्या कानी घातला. विवाह जुळवणीच्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली किती तरूणांची फसवणूक झाली आहे; याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

बघण्याचा कार्यक्रम झाला अन्‌

उंबरखेड (ता.चाळीसगाव) येथील ३० वर्षीय तरुण विवाहासाठी स्थळ शोधत आहे. मात्र स्थळ येत नसल्याने निराश होतात. अशात त्याची गाठ मोबाईलवर फेसबुकवर ऑनलाईन चॅटींग करतांना विवाहस्थळ जुळवणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उदगिर येथील एका अनाथ आश्रमाच्या संकेतस्थळावर भेट झाली. या संकेतस्थळावर एका महिलेशी ऑनलाईन संवाद झाला. महिलेने आपण अनाथ आश्रमाची संचालिका असल्याचे सांगत या (Jalgaon News) तरुणाला भुलवून उपवर मुलगी दाखवण्याबाबत होकार दिला. मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो. त्यासाठी एका दिवसात तीन बैठका होता. शेवटच्‍या बैठकीनंतर महिलेने तरुणाकडून ऑनलाईन ६ हजार रूपये उकळले.

मुलीच्या कपड्यांसाठी ४ हजार उकळले

पैसे देण्याघेण्याचे सोपस्कर पार पडल्यानंतर काही दिवसात लग्न जुळेल, या खुशीत तरूण होता. त्यानंतर तरूणाने सदर अनाथ आश्रमाच्या संचालिकेला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ती महिला फोनच घेईना. त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने या महिलेला मोबाईलवरून वारंवार मेसेज पाठवले. फोन करूनही ती महिला फोन उचलेना म्हणून तरूणाने मेसेज केल्यावर त्या महिलेने या तरुणाशी संपर्क साधला. यावेळी त्या महिलेने मुलगी अनाथ आहे. त्यासाठी तिला कपडे-चपला घ्यावे लागतील असे सांगत आणखी ४ हजार रूपये उकळले.या तरुणाने त्या महिलेच्या खात्यात एकूण १० हजार रूपये भरले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com