Online Fraud: उपचारासाठी बतावणी करत केली फसवणूक

उपचारासाठी बतावणी करत केली फसवणूक
Online Fraud
Online FraudSaam tv

जळगाव : पतंजली योग पीठ ट्रस्टमध्ये उपचार करून देत असल्याचे सांगून ५४ हजार ६०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील अयोध्यानगर परिसरात राहणाऱ्या तरूणाची फसवणूक झाली असून याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकावर एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Online Fraud
Nandurbar News: अंगणवाडी सेविकेने संपविले जीवन; मिटींगमधून परतताना घाटात उडी

जळगाव शहरातील पंकज सुभाष काळे (वय ३६) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा खासगी व्यवसाय असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. ८ फेब्रुवारीला दुपारी घरी असतांना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. माझे पतंजली योग पीठ ट्रस्ट येथे ओळख असल्याने तिथे माझ्या माध्यमातून उपचार करून देतो असे बतावणी केली. त्यानंतर पंकज काळे यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी एकुण ५४ हजार ६०० रूपये ऑनलाईन मागून घेतले.

अज्ञाताविरूद्ध गुन्‍हा दाखल

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंकज काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ९ फेब्रुवारीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com