Jalmner Crime News: चाकू धाक दाखवत कापूस लांबविला; शेतातील शेडमधील थरार

चाकू धाक दाखवत कापूस लांबविला; शेतातील शेडमधील थरार
Jalmner Crime News
Jalmner Crime NewsSaam tv

वाकोद (जळगाव) : येथील प्रगतिशील शेतकरी तथा युवा कार्यकर्ते नीलेश भगवान भगत यांच्या तोंडापूर रस्त्यावरील शेतात मध्यरात्रीच्या (Jalgaon News) चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून कापूस (Cotton) लंपास केला. (Live Marathi News)

नीलेश भगत व वाकोदचे उपसरपंच रवींद्र भगत यांचा भाऊ शरद भगत हे नेहमीप्रमाणे गावाजवळच असलेल्या तोंडापूर रस्त्यावर शेतातील खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते. या ठिकाणी जनावरे देखील बांधलेली होती. बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये शेती उपयोगी साहित्य व कापूस ठेवलेला होता. बुधवारी शरदने रात्री साडेबारापर्यंत मोबाईल बघितला व नंतर झोपी गेला.

Jalmner Crime News
Satyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या भाजप पाठिंबाबाबत मंत्री गिरीश महाजनांनी केले स्‍पष्‍ट

दोन जण आले अन्‌

मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन जणानी पलंगाजवळ येऊन पोटाला चाकू लावला व जागेवरून हलू नको, चाकूने भोसकून देऊ, अशी धमकी (Crime News) दिली. तेथे आणखी दोन जण आले आणि शेडमध्ये पडलेल्या ठिबकच्या नळ्यांनी हातपाय झोपलेल्या स्थिती खाटीला बांधून ठेवले आणलेल्या गाडीत शेजारच्या खोलीतील कापूस भरून नेला.

सकाळी दूध काढायला गेल्‍यावर प्रकार उघड

चार जण शेडमध्ये असताना बाहेर अजून काही जण होते. मात्र मला बांधलेले असल्याने कोणतीही हालचाल करता आली नाही आणि माझा मोबाईल देखील दूर फेकून दिला असल्याचे शरद भगत यांनी सांगितले. सकाळी नेहमीप्रमाणे उपसरपंच रवींद्र भगत हे शेतात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना कापसाच्या खोलीचा दरवाज खुला आणि खाली कापूस पडलेला दिसला आणि भाऊ झोपलेल्या शेडकडे धाव घेतली. तर त्याच्या हातापायाला नळीने बांधलेले दिसले. लागलीच त्याचे हातापाय सोडले असता या घटनेचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

दीड लाखाचे नुकसान

घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारल्याने चोरट्यांची मुजोरी वाढली असून, पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. अगोदरच दैनंदिन घटणाऱ्या कापसाच्या भावाने शेतकरी वर्ग हैराण झालेला असताना कापसाच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग वैतगलेला आहे. या घटनेत चोरट्यांनी सुमारे १५ ते २० क्विंटल कापसाची चोरी केली असून, सुमारे दीड लाखाच्या जवळपास नुकसान झाले आहे. मागील वर्षी देखील भगत यांच्या शेतातून कापसाची चोरी करण्यात आली होती. पहूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, चोरट्यांचा शोध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com