Taloda News: चाकूचा धाक दाखवित लुटला कापूस; रोकड अन्‌ डिझेल काढून केला पोबारा

चाकूचा धाक दाखवित लुटला कापूस; रोकड अन्‌ डिझेल काढून केला पोबारा
Taloda News
Taloda NewsSaam tv

तळोदा (नंदुरबार) : धावत्या आयशरला थांबवून ट्रकमध्ये चढून चाकूचा धाक दाखवून ट्रकचे अपहरण करीत त्यातील कापूस (Cotton) व चालकाकडील रोख रकमेची लूट करण्यात आली. याप्रकरणी (Taloda) तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Live Marathi News)

कन्नड तालुक्यातील चापनेर येथून बुधवारी (ता.१) कापूस भरून ट्रक निघाला होता. चालक लखन अंबादास ढगे (वय ३२, रा. जांबाडा टाकळी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) व क्लीनर मेहमूद दाऊत शेख (रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव) होते. गुरुवारी (२ फेब्रुवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास नंदुरबार येथून कुकरमुंडा फाटा येथे हा ट्रक आला असता फाट्यावर दोघे रिकामे कॅन घेऊन उभे होते. त्यांनी आवाज देऊन ट्रक चालकाला त्यांच्याकडील डिझेल संपल्‍याचे सांगितले. मात्र चालकाने रात्र असल्याने गाडी थांबवली नाही.

Taloda News
Buldhana News: ७ एकरातील हिरवीगार संत्रा बाग काही दिवसांतच पडली काळी; असं नेमकं घडलं तरी काय?

ट्रकचा पाठलाग करत अडविले

तेथून अक्कलकुवा रस्त्याकडे चार ते पाच किलोमीटर गाडी पुढे गेली असता कुकरमुंडा फाटा येथे थांबलेल्या दोघांनी कापूस भरलेला ट्रकचा पाठलाग केला. पुढे जाऊन ट्रक पुढे त्यांची गाडी समोर आडवी लावली. आडव्या लावलेल्या ट्रकमधून अंदाजे २५ से ३० वयाचे व चेहऱ्यावर काळा रुमाल बांधलेले दोन जण ट्रकचा दरवाजा उघडून गाडीत चढले. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवत दुसऱ्याने चालकाला त्याच्या सीटवरून बाजूला करुन स्वतः स्टेरींग सीटवर बसला. चालक व क्लिनर यांनी आरडाओरड केली असता त्यांना मारुन टाकण्याची धमकी देण्यात आली.

१२ क्विंटल कापूस व डिझेल काढले

ट्रक उलट दिशेने शहादा रोडकडे वळवून मेनरोडपासून धडगाव रोडकडे वळवला. पुढे आंबागव्हाण फाटा ते रोझवा पुनर्वसन गावादरम्यान ट्रक थांबविला. त्याच्यासोबत असलेल्यांनी ट्रक थांबवला. त्यातून दोघे जण चेह-यावर काळा रूमाल बांधलेले उतरले. त्यांनी ट्रक चालक व क्लीनर या दोघांना नॉयलॉन दोरीने बांधून मारण्याची धमकी दिली. त्यातील एकाने चालकाच्या खिशात असलेले रोख रक्कम १२ हजार रुपये व त्यांच्याकडील दोन मोबाईल काढुन घेतले. त्यानंतर चारही जनांनी चालकाच्या आयशर गाडीतून साधारण १२ क्विंटल कापूस व गाडीचे डिझेल टाकीतून साधारण ६० लिटर डिझेल काढत त्यांच्या ट्रकमध्ये बसून पळून गेले. चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com